Kolhapur Incident Heart Attack : गणेशोत्सवाच्या आनंदमय वातावरण सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली गावात हृदयद्रावक घटना घडली. श्रावण गावडे या दहा वर्षीय मुलाचा खेळता खेळता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुर्दैवी अंत झाल्याचे बोलले जात आहे.
मित्रांसोबत गणेश मंडळाच्या मंडपात खेळत असताना श्रावणला अचानक अस्वस्थ वाटू लागले. खेळ सोडून तो आईच्या कुशीत विसावला. आईच्या मांडीवर डोके टेकवत असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि क्षणात त्याने प्राण सोडले अशी माहिती समोर आली आहे.
Kolhapur Killing case : बाबा, देवपूजा करून घ्या मी निघतो, पुष्कराजचा अखेरचा संवाद; अन् मित्राने घरी येऊन गळा चिरला, पुष्कराज पडला एकाकीश्रावणच्या अकस्मात जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. लहान वयात हृदयविकाराने अशा प्रकारे प्राण जाणे हे अत्यंत दुर्मिळ असल्याने ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत.