गिरगाव सुतारगल्ली मंडळाने ३९ फूट फायबर गणेश मूर्ती स्थापन केली.
विसर्जनाऐवजी जलाभिषेक करून मूर्ती पुन्हा मंडपात नेली जाणार.
मूर्ती सलग तीन-चार वर्षे पुनर्वापरली जाणार असून दरवर्षी रंगकाम केले जाईल.
या पर्यावरणपूरक निर्णयामुळे गणेशोत्सवाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला जाणार.
गणेशोत्सव मंडळांच्या अकरा दिवसांच्या गणेश मूर्तीचे आज विसर्जन होणार आहे. असे असले तरी दक्षिण मुंबईतील गिरगावच्या सुतारगल्लीतील गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन न करण्याचा निर्णय यंदा येथील गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे. मूर्तीवर जलाभिषेक करून ती चौपाटीवरून पुन्हा मंडपात नेली जाणार आहे. हीच मूर्ती पुढच्या वर्षी नव्या स्वरुपात वापरली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पीओपी आणि पर्यावरणपूरक मूर्तीच्या न्यायालयीन वादाच्या पार्श्वभूमीवर या मंडळाने यंदा फायबरच्या मूर्तीची स्थापन केली. ही फायबरची मूर्ती ३९ फूट उंच आहे. मुख्य म्हणजे ही मूर्ती हुबेहूब पीओपीच्या मूर्तीसारखी दिसते. फायबरच्या मूर्तीचा पुनर्वापर करण्याच्या या प्रयोगाबद्दल मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन सांगळे यांनी सांगितले, सुतारगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे ६४ वर्षे जुने असून या मंडळाची उंच मूर्तीची परंपरा आहे.
Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करू नका; 10 दिवसांची पुजा ठरेल व्यर्थदरवर्षी पीओपीची मूर्ती ३५ ते ४० फुटाच्या दरम्यान असते. न्यायालयाने पीओपी मूर्तीना परवानगी दिली असली तरी ती केवळ माघी गणेशोत्सवापर्यंत आहे. त्यामुळे आम्ही पीओपीला पर्याय शोधत होतो. त्यातून फायबरच्या मूर्तीचा पर्याय पुढे आला.
Ganpati Visarjan Rituals: गणपती विसर्जनादिवशी या गोष्टी करा, तुमच्यावर राहील गणेशाची कृपामंडळाला दरवर्षी पीओपीच्या मूर्तीसाठी साडेचार ते पाच लाख रुपये खर्च येतो. यावर्षी मूर्तीसाठी मंडळाला तब्बल आठ लाख खर्च आला. मात्र, ही मूर्ती सलग तीन-चार वर्षे वापरता येणार आहे. दरवर्षी केवळ मूर्तीला रंग काम करणे, अवशेष नव्याने जोडणे हे बदल करून मूर्ती नव्या रुपात सादर होणार असल्याचे सांगळे यांनी सांगितले.
Ganpati Visarjan 2025: गणपती बाप्पाला दहीभात शिदोरी म्हणून का अर्पण करतात? जाणून घ्या कारणदरवर्षी मंडपात मोठ्या मूर्तीसोबत छोट्या मूर्तीची देखील स्थापना होते. ही पुजेची छोटी मूर्ती विसर्जित केली जाणार आहे. मंडळाने पोलिसांशी या विसर्जनाबाबत चर्चा केली असून मूर्ती पुन्हा परत आणली जाणार असल्यामुळे यंदा मंडळाची विसर्जन मिरवणूक लवकर निघणार असून लवकर परतणार आहे. सुतारगल्लीतील गणपती मंडळाचा हा प्रयोग मुंबईतील गणेशोत्सवाच्या इतिहासात नोंद घेण्यासाजोगा ठरणार आहे.