सोलापूर: जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शिक्षक दिनाच्या दिवशी एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला. त्यांनी शिक्षकांच्या घरी जाऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना सन्मानित केले. शाल, गुलाबपुष्प व पुस्तक सर्वांना भेट दिले. या अनपेक्षित आणि आकस्मिक भेटीने शिक्षक भारावून गेले होते.
Dharmaraj Kadadi:'काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धर्मराज काडादी भाजपच्या वाटेवर'; काँग्रेसने हात सोडल्याने अडचणी, सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला गळतीशिक्षक दिनाला शिक्षणाधिकारी शिक्षकांच्या घरी हा उपक्रम शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांच्या समर्पणाला मान्यता देण्यासाठी एक प्रेरणादायक उदाहरण ठरले. शिक्षकांचे कार्य समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे असून त्यांच्या योगदानाबद्दल यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली कादर शेख यांच्या हस्ते झालेल्या सन्मानामुळे शिक्षकांच्या कामाचे महत्त्व आणि त्यांचे स्थान समाजात अधिक उजागर झाले आहे.
त्यांनी शिक्षकांना त्यांच्या प्रयत्नांबद्दल आदर व्यक्त करताना म्हटले, ‘शिक्षक हे एक प्रकारचे मार्गदर्शक असतात, जे ज्ञानाचे दीप फिरवत भविष्याची पिढी निर्माण करतात. त्यांच्या योगदानाचे महत्त्व अत्यंत मोठे आहे, त्यांना योग्य मान देणे हे आपले कर्तव्य आहे. असे शिक्षणाधिकारी म्हणाले. या उपक्रमाचे शिक्षकांनीही कौतुक करत शिक्षणाधिकारी कादर शेख यांचे आभार व्यक्त केले.
Vijay Salve:'साेलापूरातील राजकीय हस्तक्षेपामुळे मिरवणुकांचे स्वरूप बदलले'; बौद्धाचार्य विजय साळवे यांचे मत, २००० पासून परिस्थिती बदलली जिल्ह्यातील शिक्षकांना प्रोत्साहनहा उपक्रम संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात शिक्षकांना प्रोत्साहित करणे, त्यांच्या कार्यात अधिक ऊर्जा भरणे आणि समाजात शिक्षकांना मान आणि आदर देण्याची प्रेरणा देण्याच्या हेतूने राबविण्यात आला.