आशिया कप 2025 जेतेपद कोणाला मिळणार? स्पर्धेआधीच भविष्यवाणी, अभिषेक शर्मा आणि वरूण चक्रवर्ती…
GH News September 07, 2025 09:14 PM

आशिया कप स्पर्धेच्या जेतेपदासाठी एकूण आठ संघ शर्यतीत आहे. त्यापैकी भारताला या स्पर्धेत जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानलं जात आहे. पण तरीही मैदानात कधी काही मोठा उलटफेर होईल सांगता येत नाही. आतापर्यंत अनेक उलटफेर क्रीडाप्रेमींनी पाहीले आहेत. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर यंदा आशिया कप स्पर्धा टी20 फॉर्मेटमध्ये आहे. आशिया कप स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. यासाठी 4-4 संघांचे दोन गट पाडले आहेत. भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान, ओमान आणि हाँगकाँग हे संघ या स्पर्धेत भाग घेणार आहेत. पण असं असलं तर सध्या फॉर्मात असलेला संघ जेतेपदासाठी दावेदार मानला जातो. आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबरला होणार आहे. आता अंतिम फेरीत कोणते दोन संघ आमनेसामने येतील याची उत्सुकता आहे. भारत-पाकिस्तान किंवा भारत अफगाणिस्तान हे संघ आमनेसामने येण्याची शक्यता क्रीडाप्रेमी वर्तवत आहे. हाच अंदाज बांधून माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने भाकीत वर्तवलं आहे.

आकाश चोप्राने आशिया कप 2025 स्पर्धेच्या जेतेपदासाठी भारतीय संघाला पसंती दिली आहे. इतकंच काय तर कोण सर्वाधिक धावा करेल, विकेट काढेल आणि प्लेयर ऑफ द सीरीज ठरेल हे देखील सांगितलं आहे. अभिषेक शर्माच्या मते, अभिषेक शर्मा या स्पर्धेत सर्वाधिक धावा करेल. तर वरुण चक्रवर्ती सर्वाधिक धावा करेल. हार्दिक पांड्या हा प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल. पण भारताचा अंतिम फेरीत सामना अफगाणिस्तानशी होईल असं त्याने सांगितलं आहे. कारण अफगाणिस्तानने मागच्या काही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. भारताच्या गटात युएई, पाकिस्तान आणि ओमान हे संघ आहेत. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना युएईविरुद्ध होणार आहे. हा सामना 10 सप्टेंबरला होणार आहे. तर 14 सप्टेंबरला भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्याची उत्सुकता भारतीय क्रीडाप्रेमींना आहे. कारण पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही संघ पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भिडणार आहेत. तर 17 सप्टेंबरला भारत आणि ओमान हे संघ आमनेसामने येतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.