Kashish Mittal : IIT ते IAS चा प्रवास... आता सगळं सोडून गायक बनले! कशिशची कहाणी तुम्हालाही थक्क करेल
Sarkarnama September 08, 2025 08:45 AM
Kashish Mittal IIT टॉपरचा प्रवास

कशिश मित्तल यांनी 2006 मध्ये JEE परीक्षेत संपूर्ण भारतात 6 वा क्रमांक मिळवला. त्यांनी IIT दिल्ली येथून संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.

Kashish Mittal UPSC मधील मोठे यश

IIT नंतर त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सुरू केली. 2011 मध्ये अवघ्या 21 व्या वर्षी UPSC मध्ये 58 वी रँक मिळवली.

Kashish Mittal IAS अधिकारी बनले

UPSC यशानंतर त्यांना AGMUT कॅडरची नेमणूक मिळाली. अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोरम व केंद्रशासित प्रदेशात त्यांनी काम केले.

Kashish Mittal IAS पदाचा राजीनामा

काही वर्षे अधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यांचा हा निर्णय चर्चेचा विषय ठरला.

Kashish Mittal मायक्रोसॉफ्टमध्ये नवी वाट

IAS सोडल्यानंतर त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये Principal Research Program Manager म्हणून ५ वर्षे काम केले.

Kashish Mittal स्वतःचे स्टार्टअप ‘दिशा AI’

2025 मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्टची नोकरीही सोडली. यानंतर ‘दिशा AI’ नावाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप सुरू केले.

Kashish Mittal संगीताचा छंद

कशिश मित्तल हे उत्तम गायकही आहेत. त्यांना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची उत्तम जाण आहे. आपली आवड जोपासता यावी म्हणून त्यांनी नोकरी सोडून गायक म्हणून नवी वाट धरली आहे.

Kashish Mittal सोशल मीडियावर लोकप्रियता

त्यांच्या गाण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. इंस्टाग्रामवर त्यांचे 80 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Nashik Guardian Minister Girish Mahajan NEXT : गणपती विसर्जन मिरवणुकीत भाजपचे संकंट मोचक महाजनांची एन्ट्री, ढोलाचा ठेका पाहून जनताही थक्क येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.