Vice President Salary : उपराष्ट्रपतींना पीएम यांच्याएवढे वेतन दिले जाते का? उत्तर आश्चर्यकारक आहे
Tv9 Marathi September 08, 2025 10:45 AM

पंतप्रधान आणि राष्ट्रपती या दोन्ही पदांसारखे देशाचे उपराष्ट्रपती पद देखील संविधानात्मक दृष्ट्या महत्वाचे पद आहे. हे भारतातील सर्वोच्च संस्थापैकी दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे पद आहे. परंतू महत्वाचे हे की पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनी प्रत्येक महिन्याला निश्चित वेतन मिळत असते. परंतू उपराष्ट्रपती यांची कोणतेही नियमित ठरलेले वेतन नसते. उपराष्ट्रपती जगदीप घनखड यांनी राजीनामा दिला आहे. तसेच नव्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूका होत आहेत. एनडीए उमेदवार सी.पी.राधाकृष्णन आणि विरोधी पक्षाचे उमेदवार पी.सुदर्शन रेड्डी 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणूकांसाठी मैदानात आहे. वास्तविक उपराष्ट्रपतीचे वेतन थेटपणे त्यांच्या पदाशी संबंधित नसते, ते त्यांच्या राज्यसभेच्या अध्यक्ष होण्याच्या भूमिकेशी जोडलेले असते. म्हणजे उपराष्ट्रपतींना जे वेतन दिले जाते ते राज्यसभेच्या चेअरमनच्या जबाबदारी निभावण्याशी संबंधित होते.

कशी ठरते सॅलरी ?

उपराष्ट्रपतीचे वेतन आणि भत्ते Salaries and Allowances of Officers of Parliament Act, 1953 अंतर्गत निश्चित होते. सध्या राज्यसभेच्या अध्यक्षांना ४ लाख रुपये मासिक वेतन मिळते.जर उपराष्ट्रपती अस्थायी रुपाने राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळत असतील तर त्या दरम्यान त्यांना राष्ट्रपती पदाचे वेतन मिळते. आणि तर राज्यसभेचे चेअरमन ( अध्यक्ष ) नसतील तर खालील सेवा आणि सुविधा मिळतात…

काय-काय सुविधा मिळतात ?

नियमित सॅलरी नसल्याने उपराष्ट्रपतींना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात.

अधिकृत निवास आणि कार्यालय

मोफत मेडिकल सुविधा

हवाई आणि रेल्वे यात्रा सुविधा

मोबाईल, लँडलाईन आणि इंटरनेट सेवा

खाजगी सुरक्षा आणि स्टाफ

एवढेच नाही तर पदावरुन हटल्यानंतर देखील माजी उपराष्ट्रपतींनी २ लाख रुपयांचे मासिक पेन्शन, टाईप-८ बंगला, खाजगी स्टाफ आणि मेडिकल सुविधा मिळतात.त्यांच्या मृत्यूनंतर पत्नीला लहान घर आणि काही सेवा सुविधा दिल्या जातात.

का चर्चेत आहे हा मुद्दा ?

अलिकडे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आरोग्याच्या कारणाने राजीमाना दिल्याचे ते चर्चेत आले आहेत. आता 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत एनडीएचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन णि विरोधी पक्षाचे उमेदवार पी. सुधर्शन रेड्डी यांच्या लढत होणार आहे.

तर असा प्रश्न निर्माण झाला आहे की उपराष्ट्रपतींना समकक्ष पद असलेल्या पीएम यांच्या सारखे वेतन मिळते का? याचा थेट उत्तर नाही असे आहे. उपराष्ट्रपतींना नियमानुसार वेतन दिले जाते. मात्र त्यांची कमाई आणि सुविधा या राज्यसभेच्या अध्यक्ष पदाशी संलग्न असतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.