सोलापूर : गल्लीतील चिमुकल्या मित्रांसमवेत गणपतीची विसर्जन मिरवणूक पाहायला घराबाहेर पडलेल्या चिमुकल्याचा भरधाव तीनचाकी माल वाहतूक रिक्षाच्या धडकेत (एमएच १३, सीटी ९०९७) जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. ६) दुपारी १२ च्या सुमारास मराठा वस्ती चौकात घडली. यश अजय कदम (वय ६, रा. मराठा वस्ती, भवानी पेठ) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
Ganpati Visarjan 2025: 'फलटणला दगडफेक; १३ जणांना अटक', जिंती नाक्यावर दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांचा राडागणेश विसर्जनाची शाळेला सुटी असल्याने यश घरीच होता. दुपारी बाराच्या सुमारास गल्लीतून गणपतीची मिरवणूक जात असल्याचा आवाज कानी पडला आणि तो घराजवळील चिमुकल्या मित्रांसोबत घराबाहेर पडला. रस्ता ओलांडताना पाण्याचे जार घेऊन निघालेल्या तीन चाकी रिक्षाने यशला जोरात धडक दिली. अपघातानंतर त्याला रिक्षाने फरफटत नेले.
त्यात त्याच्या छातीला, डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली होती. तातडीने त्याला दवाखान्यात हलविले, पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत यशची आई आरती कदम यांनी जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून रिक्षा चालकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
MLA Shashikant Shinde:'मराठा बांधवांकडून शशिकांत शिंदेंचा सत्कार'; ल्हासुर्णेत कार्यक्रम, नवी मुंबईत आंदोलकांची राहणे व जेवणाची सोय एकुलता एक मुलगा दगावलाफिर्यादी आरती कदम या गृहिणी असून त्यांचे पती अजय कदम हे हॉटेल कामगार आहेत. त्यांना यश हा एकुलता एक होता. अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची वार्ता समजताच आईने हंबरडा फोडला. या प्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालक दिलीप राजाराम बाबर (वय ५२, रा. होमकर नगर, भवानी पेठ) याला अटक केली आहे.