१ अजय देवगणचा नवीन चित्रपट 'धमाल' लवकरच प्रदर्शित होणार आहे.
२ रितेश देशमुख, अर्शद वारसी आणि जावेद जाफरी यांची धमाल तिकडी पुन्हा एकत्र येणार आहे.
३ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
बॉलीवूडमध्ये कॉमेडी फ्रॅंचायझींची चर्चा झाली की ‘धमाल’ चित्रपटाचा उल्लेख हमखास होतो. २००७ मध्ये आलेल्या पहिल्या भागापासून या चित्रपटाने प्रेक्षकांना भरपूर हसवले. ‘डबल धमाल’ (२०११) आणि ‘टोटल धमाल’ (२०१९) नंतर आता चौथा भागही चित्रपटगृहांत दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे.
नुकतेच अभिनेता अजय देवगणने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘धमाल-४’च्या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा केली. हा चित्रपट २०२६ च्या ईदला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. पोस्टमध्ये सर्व कलाकारांचे फोटो ‘धमाल टाईम्स’ या काल्पनिक वृत्तपत्राच्या रूपात सादर करण्यात आले होते, ज्यातून प्रत्येक पात्राबाबत छोट्या हिंट्स दिल्या गेल्या आहेत.
View this post on InstagramA post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)
.
या चित्रपटात अजय देवगणसोबत अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी आणि रवी किशन हे कलाकार पुन्हा एकदा दिसणार आहेत. विशेष म्हणजे, रवी किशन या वेळी खलनायकाच्या भूमिकेत झळकणार असून, त्याचा लूकही पोस्टरमधून समोर आला आहे. त्याचबरोबर संजय मिश्रा, उपेंद्र लिमये, ईशा गुप्ता, संजीदा शेख आणि अंजली आनंद हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकतील.
FAQs
‘धमाल ४’ चित्रपटाची रिलीज डेट काय आहे?
हा चित्रपट २०२६ च्या ईदला रिलीज होणार आहे.
‘धमाल ४’मध्ये मुख्य कलाकार कोण असतील?
अजय देवगण, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी आणि रवी किशन यांचा समावेश आहे.
रवी किशन कोणत्या भूमिकेत दिसणार आहे?
रवी किशन या वेळेस खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.
‘धमाल ४’च्या पोस्टरमध्ये काय खास दाखवले आहे?
पोस्टरमध्ये सर्व कलाकारांचे फोटो ‘धमाल टाईम्स’ या काल्पनिक वृत्तपत्राच्या स्वरूपात दाखवले आहेत.
जान्हवी कपूरच्या भाषाशैलीवर सोनम बाजवाची थट्टा