धक्कादायक! चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार...कुटुंबीय गणपती विसर्जनाला गेले असता घडला प्रकार, गुन्हा दाखल
esakal September 09, 2025 05:45 AM

Akola sexual harrasment case : अकोल्यात एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तौहिद समीर बैद असं आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तौहिद याने अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत हा प्रकार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

अकोल्याच्या डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत काल शनिवारी 6 सप्टेंबर रोजी दुपारी ४:३० वाजताच्या दरम्यान पीडित मुलीचे नातेवाईक सर्व गणेश विसर्जन निमित्त गणपती पाण्यासाठी गेले होते. याच वेळी कोणी नसल्याचा फायदा घेत हा आरोपी हा पीडित अल्पवयीन तरुणीच्या घरी आला. तेव्हा पीडीतीचा मानलेला भाऊ हा त्या ठिकाणाहून जात असताना आरोपीचा आणि पिढीतेचा आवाज त्याला आला.

Mumbai Crime : मुंबईत भरचौकात दोन गट भिडले, वृद्धाचा मृत्यू तर अनेक जखमी; भयानक राड्याचा व्हिडिओ व्हायरल

तेव्हा त्यांनी आरोपीला हटकले तर आरोपीने जवळील चाकू काढून त्याला धाक दाखवला. तेवढ्यातच आजूबाजूचे शेजारी आवाजाच्या दिशेने पाहण्यासाठी आले असता त्यांनाही आरोपीने चाकूचा धाक दाखवला. यावेळी आरोपी 24 वर्षीय तौहिद समीर बैद याच्या तावडीतून सुटून भयभीत झालेली मुलगी ही दिलीप नावाच्या व्यक्तीच्या पडलेल्या घरात लपली, तेव्हा मुलीच्या पाठीमागे आरोपी गेला आणि चाकूचा धाक दाखवून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचं जबरी शारीरिक शोषण केलं.

यावेळी मुलीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच याबाबतची माहिती नातेवाईकांना दिली तर तुझ्या आई वडील भाऊ यांनाही मारून टाकू अशी धमकी दिली. त्याच्यावर आरोपी शोषण करून निघून गेला यानंतर पीडित मुलीची आई घरी आल्यानंतर तिला पीडीतीने सर्व हकीकत सांगितली.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दरम्यान अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी डाबकी रोड पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिसांनी आरोपी विरोधात पोस्को'सह विविध कलमानुसार अंतर्गत गुन्हे दाखल केले, या प्रकरणानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी पोलीस ठाण्यात जमा होऊन आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

Sangli Crime: 'विसर्जन मिरवणुकीत तरुणास चाकूने भोसकले'; अंकलीत घटना, पोलिसांकडून तिघांना अटक; एकजण रेकॉर्डवरील गुन्हेगार

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी तौहिद याला बेड्या ठोकण्यासाठी एक पथक गठीत केलं असून त्याचा शोध घेत आहेत. आरोपींनी यापूर्वीही रामदास पेठ पोलीस स्टेशन आणि इतर अनेक ठिकाणी गुन्हे केले असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी सध्या पोलीस कसून शोध घेण्यात येत आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.