Vice Presidential Election: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिल्याननंतर आता देशाला उपराष्ट्रपती यांची आवश्यकता आहे. जगदीप धनखड यांन्या राजीनाम्यानंतर उद्या म्हणजे 9 सप्टेंबर रोजी भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी लढत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि इंडिया अलायन्सचे सुदर्शन रेड्डी यांच्यामध्ये होणार आहे. आता या शर्यतीत कोण बाजी मारणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण लोकसभेत एनडीएचे बहुमत असल्याने राधाकृष्णन जिंकण्याची शक्यता जास्त आहे… अशी देखील चर्चा आहे. त्यामुळे उद्या होणारी लढत ही अधिक चुरशीची मानली जात आहे.
सांगायचं झालं तर, उपराष्ट्रपती पदहे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद आहे. जगदीप धनखड, हमीद अन्सारी आणि एम. व्यंकय्या नायडू यांसारख्या दिग्गज व्यक्तींनी या पदावर काम केलं आहे. तर या मोठ्या पदावर काम उपराष्ट्रपतींना कोणत्या सुविधा मिळतात जाणून घेऊ…
उपराष्ट्रपतींना देण्यात येणाऱ्या सुविधाअधिकृत निवासस्थान – उपराष्ट्रपतींना दिल्लीच्या लुटियन्स झोनमध्ये एक भव्य सरकारी बंगला मिळतो. येथे त्यांची राहण्याची सुविधा पूर्णपणे सुरक्षित असते. शिवाय यासाठी त्यांनी कोणतेही पैसे मोजावे लागत नाहीत.
वेतन आणि भत्ते- उपराष्ट्रपतींना दरमहा 4 लाख रुपये वेतन दिलं जातं. याशिवाय त्यांना भत्ता आणि पेन्शन मिळते.
सुरक्षा- उपराष्ट्रपतींना केंद्र सरकारकडूनही सुरक्षा मिळते. त्यांना एसपीजी आणि फोर्स सिक्योरिटी यांच्याकडून देखील सुरक्षा दिली जाते. त्यांना नेहमीच Z+ सुरक्षा प्रदाण करण्यात येते…
वाहने- त्यांना अधिकृतपणे बुलेटप्रूफ वाहने दिली जातात आणि देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करण्यासाठी हवाई दलाची विमाने आणि हेलिकॉप्टर पुरवले जातात. हा प्रवास मोफत असतो.
कर्मचारी आणि कार्यालयीन सुविधा – उपराष्ट्रपतींना त्यांच्या अधिकृत निवासस्थानी वैयक्तिक कर्मचारी, सचिवालय आणि सहाय्यक अधिकारी देखील मिळतात. त्यांच्याकडे काम करण्यासाठी स्वतंत्र उपराष्ट्रपती कार्यालय देखील असतं.
प्रवास भत्ता- उपराष्ट्रपती यांच्या देशांतर्गत आणि परदेशी प्रवासाचा संपूर्ण खर्च सरकार करते. परदेशी दौऱ्यांवर उच्चस्तरीय प्रोटोकॉल आणि स्वागत सुविधा देखील प्रदान केल्या जातात.
वैद्यकीय सुविधा- उपराष्ट्रपती यांना सरकारी आणि सीजीएचएस रुग्णालयात मोफत उपचार सुविधा मिळते. येथे त्यांना व्हीआयपी उपचार मिळतात आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान वैद्यकीय पथकाची सुविधा देखील दिली जाते.
पेन्शन आणि सुविधा- कार्यकाळ संपल्यानंतर किंवा राजीमानी दिल्यानंतर त्यांना मासिक पेन्शन सुविधा मिळते. त्यांना कर्मचारी, गाडी आणि ड्रायव्हर देखील मिळतो. पेन्शनसोबत सरकारी निवास व्यवस्था देखील दिली जाते.