सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रत्येक गोष्ट आता सोशल मीडियावर सहज मिळू लागली आहे. त्यामुळे लोकांचा कल सोशल मीडियाकडे वाढला आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी लोक सोशल मीडियाचा वापर करत आहेत. त्यामागची कारणंही वेगळी आहे. तसेच त्यांची प्रायोरिटीही वेगळी आहे. पण एका महिलेने तर चक्क नवरा शोधण्यासाठीच सोशल मीडियाचा वापर केला आहे. तिने थेट नेटकऱ्यांना चांगला नवरा शोधून देण्याची ऑफर दिली आहे. ऑफर म्हणून घसघशीत रकमही जारी केली आहे. त्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. सध्या इंटरनेटवर ही महिला, तिची अट आणि तिची तगडी ऑफर यामुळे चर्चेत आली आहे.
ऐला असं या 33 वर्षीय तरुणीचं नाव आहे. ती अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील बे एरियात राहते. ऐला पेशाने मॉडल आहे. तसेच ओनलीफॅन्स स्टारही आहे. गेल्याच महिन्यात तिने तिला लग्न करायचंय आणि त्यासाठी मुलगा हवा असल्याचं जाहीर केलं होतं. जी व्यक्ती मुलगा शोधून देण्यात मदत करेल त्याला मालामाल करणार असल्याचंही तिने जाहीर केलं आहे. माझं लग्न लावून देणाऱ्याला मी 1 लाख डॉलर देईन. किंवा गर्भधारणेची डील करण्यासाठी 3 लाख डॉलर देईन. तुम्ही मला एखाद्या मुलाची शिफारस केल्यास मी त्याच्याशी लग्न करेन. त्याबदल्यात तुम्हाला 1 लाख डॉलर म्हणजे सुमारे 88 लाख रुपये देईन, असं ऐलाने म्हटलंय.
त्याला मुलांची आवड असावी
मी अत्यंत अजीब व्यक्ती आहे. डेट करण्यासाठी मला मुलं मिळत नाहीत असं नाही. तसेच लग्नासाठीही मला मुलं मिळत नाहीत असं नाही. पण अशा व्यक्तीशी लग्न करायचं की ज्याचा ग्रुप अत्यंत छोटा असेल. पूर्णपणे बहुपत्नीत्व (पॉलीगेमी) मानणारा पुरुष मला हवाय. त्याच्यामध्ये सेक्श्युअॅलिटी कुटून कुटून भरलेली असेल. माझ्याएवढीच त्याची संपत्ती असावी. त्याला आर्थिक दृष्ट्या सहारा देण्याची मला गरज पडू नये. त्याला मुली हवी असावीत आणि तो पूर्णपणे सेल्फ एक्सेप्टिंग असावा, अशी इच्छा व्यक्त करतानाच असा मुलगा मिळणं थोडं कठिणच आहे. त्यामुळे मी आधीपासूनच माझं नशिब अजमावण्याचा प्रयत्न करत आहे, असं ऐलाने म्हटलंय.
डील झाली तर मिळणार…
तुम्ही माझ्यासाठी अशी व्यक्ती शोधून आणू शकता की, जो मला गर्भवती करेल आणि मुलांच्या संगोपणासाठी मला एक कोटी डॉलर देईन. जर अशी डील झाली तर मी तुम्हाला तीन लाख डॉलर देईन, असं तिने म्हटलंय. ऐलाने एका मुलाखतीत तिला एक बॉयफ्रेंड असल्याचं म्हटलं होतं. एका फॅन्सनेच मला त्याच्याशी भेट घालून दिली होती. गेल्या चार वर्षापासून तो माझ्यासोबत आहे. पण आता मला एका नवऱ्याची आवश्यकता आहे, असं ती म्हणतेय.