मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास आता आणखी आरामदायी आणि आधुनिक होणार आहे. मुंबई रेल्वे विकास निगम (एमआरव्हीसी)ने तब्बल २,८५६ पूर्णपणे वातानुकूलित वंदे मेट्रो (उपनगरीय) डब्यांच्या खरेदीसाठी मोठी निविदा जाहीर केली आहे. हे डबे १२, १५ आणि १८ डब्यांच्या रॅक स्वरूपात धावणार असून गर्दी कमी करण्यासोबतच प्रवास सुखकर आणि सुरक्षित होणार आहे.
सध्या बहुतेक लोकल१२ डब्यांच्या असल्या तरी काही गाड्या १५ डब्यांच्या आहेत. वाढत्या प्रवाशांच्या मागणीला लक्षात घेऊन या नव्या खरेदीत १५ डब्यांच्या गाड्यांना प्राधान्य दिले जाणार आहे, तसेच आवश्यकतेनुसार १८ डब्यांचे रॅकही आणले जातील. एमयूटीपी टप्पा ३ व ३ए अंतर्गत ६ सप्टेंबर रोजी ही निविदा जाहीर झाली. या अंतर्गत केवळ डबे खरेदीच नाही तर पुढील ३५ वर्षे त्यांची देखभाल करण्याचाही समावेश आहे.
Palghar News: समुद्रकिनाऱ्यावर कंटेनर, ओमानमधून वाहून आल्याचा अंदाजयासाठी भीवपुरी (मध्य रेल्वे) व वाणगाव (पश्चिम रेल्वे) येथे दोन अत्याधुनिक डेपो उभारले जातील. निविदा सादरीकरण ८ डिसेंबरपासून सुरू होईल तर २२ डिसेंबर रोजी निविदा उघडण्यात येईल. हा प्रकल्प मेक इन इंडिया धोरणानुसार राबवला जाणार असल्याने देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळणार आहे.करारानंतर दोन वर्षांत पहिला प्रोटोटाइप रॅक मुंबईत दाखल होणार आहे.
वंदे मेट्रो डब्यांची वैशिष्ट्येपूर्णपणे वातानुकूलित व वेस्टिब्यूल्ड रॅक
स्वयंचलित दरवाजे बंद प्रणाली
गादीदार आसन, मोबाइल चार्जिंग व माहितीप्रद स्क्रीन
१३० कि.मी. प्रतितास वेग क्षमता
दोन्ही टोकांना विक्रेत्यांसाठी डबे
उच्च क्षमतेची प्रगत सुरक्षा प्रणाली
२,८५६ वंदे मेट्रो डब्यांची ही खरेदी मुंबईतील लोकल सेवेत क्रांती घडवेल. लांब, जलद आणि सुरक्षित रॅक सुरू करून गर्दी कमी करणे, वेळेवर सेवा आणि प्रवासी सुरक्षा यांना आम्ही प्राधान्य देणार आहोत. जागतिक दर्जाच्या सुविधा मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करतील,असे एमआरव्हीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर म्हणाले.