नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या (Gold Rate and Sliver Rate) दरात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. जीएसटीसह (Gold Rate with GST) सोन्याच्या दरानं 1लाख 12 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर चांदीच्या दरात (Silver Price) देखील मोठी झाल्याचं पाहायला मिळालं. जीएसटीसह सर्राफा बाजारात चांदीचे दर 128429 रुपये किलो झाले आहेत. 24 कॅरेट सोन्याचे एका तोळ्याचे सोन्याचे दर जीएसटीसह 112417 रुपयांवर पोहोचेल आहेत. आयबीजेएच्या माहितीनुसार सोमवारी चांदीचा जीएसटी शिवायचे दर 124413 रुपये होता. सोन्याचा एका तोळ्याचा जीएसटी शिवायचा दर 108037 रुपये इतका होता.
सोन्याच्या दरात 1106 रुपयांची वाढ होऊन जीएसटीशिवाय एका तोळ्याचा दर 109143 रुपयांवर पोहोचला आहे. तर, चांदीच्या दरात देखील 276 रुपयांची वाढ एका किलोमागं झाली आहे. सप्टेंबरमध्ये सोन्याचा दर 4351 रुपयांनी वाढला आहे. तर, चांदीच्या दरात एका किलोमागं 8839 रुपयांची वाढ झाली आहे. आयबीजेएच्या दरांनुसार चांदीचा जीएसटीशिवायचा दर 124689 रुपये आहे. ऑगस्ट महिन्यात सोन्याचा एका तोळ्याचा दर 102388 रुपये तर चांदीचा एका किलोचा दर 117572 रुपये होता.
24 कॅरेट सोन्याप्रमाणं 23 कॅरेट सोन्याच्या दरात देखील 1106 रुपयांची वाढ होऊन ते 108706 रुपये 10 ग्रॅमवर पोहोचलं आहे. जीएसटीसह 23 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 111967 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 1013 रुपयांनी वाढून 99975 रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह हा दर 102974 रुपयांवर आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 829 रुपयांची वाढ होऊन ते 81857 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह 18 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 84312 रुपये होतो. 14 कॅरेट सोन्याचा जीएसटीसह एका तोळ्याचा दर 65764 रुपये आहे.
सोने आणि चांदीचे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनकडून जाहीर केले जातात. आयबीजेएनं जारी केलेल्या दरांमध्ये आणि प्रत्यक्ष तुमच्या शहरातील सोन्याचा दर 1000 ते 2000 रुपयांनी वेगळा असू शकतो. आयबीजेएकडून दिवसभरात दोन दर जाहीर केले जातात.
दरम्यान, भारतात ज्या प्रमाणं सोन्याचे दर वाढले आहेत त्याच प्रमाणं आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील धोरणानंतर निर्माण झालेल्या जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळं सोने आणि चांदीचे दर वाढत आहेत. ज्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्ध किंवा इतर कारणांमुळं अस्थिरता निर्माण होते तेव्हा सोने आणि चांदीमध्ये गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून गुंतवणूक वाढते.
आणखी वाचा