धुळे जिल्ह्यात एसटी बस आणि दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात
१२ वर्षीय विद्यार्थिनी लक्ष्मी जयस्वाल हिचा उपचारादरम्यान मृत्यू
तीन जण गंभीर जखमी
गावात शोककळा पसरली
धुळेजिल्ह्यातील साक्री-पिंपळनेर रस्त्यावर एक भीषण अपघात घडला आणि त्यात एका निष्पाप बारा वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत झाला. साक्रीहून पिंपळनेरकडे जाणारी परिवहन महामंडळाची बस कान नदीच्या पुलाजवळ आली असता, पिंपळनेरहून साक्रीकडे जाणाऱ्या दुचाकींना धडकली. या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले असून एकाच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साक्रीहून पिंपळनेरकडे जाणारी परिवहन महामंडळाची बस कान नदीच्या पुलाजवळ आली असता, पिंपळनेरहून साक्रीकडे जाणाऱ्या दुचाकींना धडकली. या धडकेत करणारी लक्ष्मी दिनेश जयस्वाल (वय १२) आणि तिची आई माधुरी दिनेश जयस्वाल (वय ४०) गंभीर जखमी झाले. दुचाकीवर प्रवास करणारे जयवंत दखल सूर्यवंशी (वय ३५) आणि दिनेश रमेश पावरा (वय ५५) हे दोघेही गंभीर जखमी झाले.
Dhule Crime : गजानन महाराज मंदिरातून दानपेटी चोरी; सहा तासांत चोरटे पोलिसांच्या ताब्यातघटनेनंतर नागरिक आणि पोलीसांनीतत्काळ जखमींना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गंभीर अवस्थेत लक्ष्मी दिनेश जयस्वाल या बारा वर्षीय विद्यार्थिनीला धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असताना उपचारादरम्यान लक्ष्मी जयस्वाल या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.
Dhule : अतिक्रमण कारवाईत पोलिसांकडून मारहाण; भाजी विक्रेत्यांचा आरोप, संतप्त विक्रेत्यांनी केला रास्ता रोकोलक्ष्मीच्या जाण्याने जयस्वाल कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. शालेय वयातील चिमुकलीचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी तीव्र हळहळ व्यक्त केली आहे. परिसरात या अपघातामुळे संतापाचं वातावरण आहे. दरम्यान, बसचालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याची प्राथमिक सुरू असून आहे.