थोडक्यात:
गर्भावस्थेत मद्यपान केल्यास अल्कोहोल थेट बाळाच्या रक्तप्रवाहात जाऊन मेंदूच्या पेशींना कायमचे नुकसान करू शकते.
यामुळे ‘फीटल अल्कोहोल सिंड्रोम’ निर्माण होऊन बाळाला शिकण्यात, स्मरणशक्तीत आणि भाषिक विकासात अडचणी येऊ शकतात.
चेहऱ्यावरील व शरीरावरील विकृती, भावनिक अस्थिरता आणि वर्तनात्मक समस्या देखील या सिंड्रोममुळे दिसून येतात.
How Alcohol in Pregnancy Can Harm Your Baby: गर्भावस्थेतही मद्यपान करताय? तर हे थेट गर्भवतीच्या आरोग्यावरच नव्हे तर होणाऱ्या बाळावरही परिणाम करू शकते. अल्कोहोल थेट गर्भातील बाळाच्या रक्तप्रवाहात पोहचते. या टप्प्यावर शरीराचे आणि मेंदूचे अवयव अजून विकसित होणार असल्याने मद्याचा अंश मेंदूच्या पेशींना कायमचे नुकसान करतो आणि परिणामी बाळाला ‘फीटल अल्कोहोल सिंड्रोम’(एफएएस) निर्माण होऊ शकतो. अशा मुलांना शिकण्यात अडचणी, स्मरणशक्ती कमी, भाषिक विकासात उशीर, चेहऱ्यावर व शरीरावर विकृती, भावनिक अस्थिरता आणि वर्तनात्मक अडचणी दिसून येतात, अशी माहिती तज्ज्ञ देतात.
दरवर्षी ९ सप्टेंबर हा ‘जागतिक फीटल अल्कोहोल सिंड्रोम’ दिन साजरा केला जातो. नऊ महिने हा काळ गर्भवती महिलांसाठी सर्वात महत्त्वाचा असतो. या काळात एक थेंबही मद्यपान न करणे हे बाळाच्या निरोगी जन्मासाठी आवश्यक असते. याबाबत माहिती देताना वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद तेलंग म्हणाले, ‘‘गर्भावस्थेत मद्यपानाचा सल्ला कधीही दिला जात नाही. गर्भावस्थेत मद्यपान टाळले जाते.’’
Diabetes Management During Pregnancy: गर्भधारणेदरम्यान मधुमेह कसा हाताळावा? जाणून घ्या महत्त्वाची माहितीआजच्या घडीला मद्यपान करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढते आहे. शहरी जीवनशैलीतील ताणतणाव, समवयस्क दबाव, पार्टी कल्चर आणि मद्य कंपन्यांची आक्रमक जाहिरात यामुळे मद्यपान सामान्य झाले आहे. परिणामस्वरूप यकृताचा आजार, कर्करोग, मानसिक विकार, आत्महत्यांचे प्रमाण, तसेच रस्ते अपघात आणि हिंसाचार वाढले आहेत. या सर्वांचा परिणाम थेट कुटुंबांवर व समाजावर होतो.
मद्यपींची संख्या जितकी वाढेल तितक्या ‘एफएएस’ व इतर न्यूरो-डेव्हलपमेंट विकारांनी त्रस्त बालकांची संख्याही वाढेल, असा धोका संतुलन व्यसनमुक्ती केंद्राचे मानस मेहेंदळे यांनी व्यक्त केला. उद्याची निरोगी, सक्षम आणि सुदृढ पिढी घडवायची असेल तर आजपासून जागरूक होणे अत्यावश्यक आहे. नऊ महिने संयम म्हणजे आयुष्यभरासाठी निरोगी मूल हीच या दिवसाची खरी शिकवण असल्याचे त्यांनी सांगितले.
Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी ‘एफएएस’चे तोटे‘एफएएस’ग्रस्त मुलांमध्ये स्वमग्नता, अभ्यास किंवा कामावर लक्ष केंद्रित न करता येणारा ‘अटेंशन डेफिसिट हायपरॲक्िटव्हीटी डिसॉर्डर होण्याची शक्यता वाढते
बौद्धिक कमजोरी, अतिचंचलता, लक्ष केंद्रित न होणे, झोपेचे विकार, नैराश्य आणि सामाजिक कौशल्यांचा अभाव असे विकारदेखील दिसतात.
मानसिक आजार, स्वतःला हानी पोहोचवण्याची प्रवृत्ती आणि लहान वयात व्यसनाकडे झुकण्याची शक्यता वाढते.
या मुलांना केवळ वैद्यकीय उपचारच नव्हे, तर विशेष शिक्षण, समुपदेशन आणि आजीवन आधाराची गरज असते.
हे धोके टाळण्यासाठी मद्यपान टाळायला हवे
गर्भावस्थेत मद्यपान केल्यास बाळावर काय परिणाम होतो?
(What are the effects of alcohol consumption during pregnancy on the baby?)
गर्भावस्थेत मद्यपान केल्यास अल्कोहोल थेट गर्भातील बाळाच्या रक्तप्रवाहात पोहोचते. यामुळे बाळाच्या मेंदू व इतर अवयवांच्या विकासावर परिणाम होतो आणि ‘फीटल अल्कोहोल सिंड्रोम’ (FAS) निर्माण होण्याचा धोका असतो. या सिंड्रोममुळे बाळाला शिकण्यात अडचणी, स्मरणशक्ती कमी होणे, भाषिक विकासात उशीर, चेहऱ्यावर व शरीरावर विकृती, भावनिक अस्थिरता आणि वर्तनात्मक अडचणी दिसून येतात.
फीटल अल्कोहोल सिंड्रोम म्हणजे काय?
(What is Foetal Alcohol Syndrome?)
फीटल अल्कोहोल सिंड्रोम (FAS) हा गर्भावस्थेत मद्यपानामुळे होणारा एक गंभीर न्यूरो-विकासात्मक विकार आहे. अल्कोहोलमुळे गर्भातील मेंदू आणि शरीराचा विकास बाधित होतो, ज्यामुळे बौद्धिक कमजोरी, अतिचंचलता, लक्ष न लागणे, झोपेचे विकार, नैराश्य आणि सामाजिक अडचणी यांसारखी लक्षणे निर्माण होतात. अशा मुलांना आजीवन आधार आणि विशेष उपचाराची गरज असते.
गर्भावस्थेत मद्यपान टाळणे का गरजेचे आहे?
(Why is it important to avoid alcohol during pregnancy?)
गर्भावस्थेच्या नऊ महिन्यांमध्ये मद्यपान केल्यास बाळाचा मेंदू व अवयव यांचा विकास थांबतो किंवा चुकीचा होतो. यामुळे जन्मतः दोष, मानसिक आजार आणि वर्तनात्मक समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. निरोगी व सक्षम बाळासाठी आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी मद्यपान पूर्णपणे टाळणे आवश्यक आहे.
फीटल अल्कोहोल सिंड्रोमपासून मुलांचे रक्षण कसे करावे?
(How can children be protected from Foetal Alcohol Syndrome?)
फीटल अल्कोहोल सिंड्रोमपासून मुलांचे रक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे गर्भधारणेच्या संपूर्ण काळात मद्यपान टाळणे. ताणतणाव किंवा सामाजिक दबावामुळे मद्यपान करण्याची प्रवृत्ती वाढते, त्यामुळे कुटुंब व समाजाने जागरूक राहून समर्थन द्यावे. आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला, समुपदेशन आणि मद्यविमुक्ती केंद्रांची मदत घेऊन सुरक्षित आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करावे.