-मार्तंड बुचुडे
पारनेर : पारनेर ते सिद्धेश्वर वाडी रस्त्यावर सिद्धेश्वरवाडी रस्त्यावरील बारामती ॲग्रो परिसरात सोमवारी (ता. ८) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका तीन वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केला. व त्यास जंगलाकडे ओढून नेल्याची घटना घडली. सिद्धेश्वरवाडी रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या या बांधकाम मजूराच्या ( परप्रांतीय) कुटुंबातील हा मुलगा होता.
आनंदाची बातमी! 'गायीच्या दूध दरात तीन रुपयांपर्यंत वाढ'; सातारा जिल्ह्यात सुमारे ५५ हजार दूध उत्पादकांना दिलासाअमन पन्नूलाल खुंटे (वय तीन ) असे त्याचे नांव असून तो रात्री नऊ वाजनेच्या सुमारस लघुशंकेसाठी घराबाहेर आला असताना त्याच्या आईच्या डोळ्यासमोरच बिबट्याने त्याच्यावर झडप घेतली व जगंलाच्या दिशेने झाडीत ओढून नेले.
स्थानिकांनी नागरिकांनी तातडीने ही घटना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्या नंतर वन विभागाने रात्री दोन वाजेपर्यंत युद्धपातळीवर या मुलाचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. यावेळी स्थानिक नागरिकही शोध मोहिमेत सहभाग घेतला. मात्र रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही तो सापडला नाही. आज(ता. 9) सकाळी सात वाजलेपासुन पुन्हा शोध मोहीम सुरु केली. सकाळी आठ वाजणेच्या सुमारास सिद्धेश्वरवाडी परिसरातील जंगलात, घटनास्थळापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर झुडपात अमनचा मृतदेह सापडला.
रात्री व सकाळी घेण्यात आलेल्या शोधमोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी जी. व्ही. धाडे, वनपाल एम. वाय. शेख, वनरक्षक अफसर पठाण, फारुख शेख, कानिफनाथ साबळे, एस. के. कार्ले, साहेबराव भालेकर, अंकराज जाधव, यांच्या सह स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला होता.बिबट्याचा शोधासाठी या जंगल परिसरात पिंजरे लावण्यात आले आहेत. तसेच या परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे.
तालुक्यात नुकतीच दोन सप्टेंबरला कळस येथेही बिबट्याच्या हाल्याची अशीच दुर्दैवी घटना घडली होती. त्यात गणेश गाडगे (वय 40) या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तालुक्यातील एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याने तालुकाभर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात या पूर्वी पाळीव प्राण्यांवर हल्ले होत होते आता थेट मानवी वस्तीकडे बिबटयाचा वावर वाढला आहे. व त्यातही थेट मानवी हळ्यामुळे नागरिकांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांमुळेही चिंता वाढली आहे.
Honesty Employee :'साईंच्या दरबारातील टोकाचा विरोधाभास'; कंत्राटी कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरातून कौतुकवन विभागाने नागरिकांना रात्री सावध राहण्याचे आवाहन केले आहे. लहान मुलांना रात्री एकटे घराबाहेर सोडू नये. तसेच शेतात रहाणाऱ्या शेतकऱ्यांनी घराबाहेर पडताना हातात विजेरी व शक्यतो काठीघेऊनच बाहेर पडावे. - गजनन धाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी.