इस्लामपूर : पूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून बेकायदेशीर जमाव जमवून येथे दोन गटांत हाणामारी झाली. यात दोन्ही बाजूंच्या १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सचिन बाळासाहेब चव्हाण (वय ४८) व रतन गोविंद वडार (३५, दोघे वडार गल्ली, इस्लामपूर) या दोघांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत.
Honesty Employee :'साईंच्या दरबारातील टोकाचा विरोधाभास'; कंत्राटी कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरातून कौतुकइस्लामपूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सचिन चव्हाण हे काल (ता. ७) रात्री पावणेनऊच्या सुमारास येथील पशुवैद्यकीय दवाखान्याशेजारी असलेल्या वाळवा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्यासमोर उभे होते. कव्वालीचा कार्यक्रम पाहून ते व त्यांचा मुलगा जयवर्धन याच्यासोबत घरी परतत होते. पतसंस्थेसमोर आल्यानंतर आनंदराव शामराव वडार, सचिन दत्तात्रय वडार, रतन गोविंद वडार, अरुण गोविंद वडार, अरुण गोविंद वडार, अमोल लक्ष्मण वडार, महेश दत्तात्रय वडार, संदीप रामचंद्र वडार व आदित्य अरुण धोत्रे (सर्व वडार गल्ली इस्लामपूर) यांनी बेकायदेशीर जमाव जमवून पूर्वीच्या वादाच्या कारणावरून मारहाण केली.
आनंदराव याने त्याच्या हातातील काठीने डाव्या हातावर, पायावर मारून जखमी केले. इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादीचा मुलगा जयवर्धन मध्ये पडला असता त्यालाही धक्काबुक्की, शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या भांडणात सचिन यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची साखळी व खिशातील पाकीट गहाळ झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
रतन वडार यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की काल रात्री ते पावणेनऊच्या सुमारास शिक्षक पतसंस्थेच्या समोर मित्र सचिन वडार बोलत बसले होते. त्यावेळी सचिन चव्हाण, प्रमोद ऊर्फ संजय पांडुरंग जाधव, आनंद नेताजी वडार, पंकज दीपक वडार, राहुल अनिल वडार, उमेश दीपक वडार, लखन वडार (सर्व वडर गल्ली, इस्लामपूर) यांनी सायकलवरून येऊन बेकायदेशीर जमाव जमवून पूर्वीच्या वादातून मारहाण केली.
आनंदाची बातमी! 'गायीच्या दूध दरात तीन रुपयांपर्यंत वाढ'; सातारा जिल्ह्यात सुमारे ५५ हजार दूध उत्पादकांना दिलासासचिन याने काठीने दोन्ही हातावर तसेच उजव्या गुडघ्यावर मारून जखमी केले. प्रमोदने काठीने सचिन यांच्या उजव्या खांद्यावर मारून जखमी केले. तसेच इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडणे सोडवण्यासाठी आलेले सुरेश कलकुटकी, संदीप वडार, अरुण वडार, आदित्य धोत्रे यांनाही सचिन, प्रमोद व इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ करून ‘तुम्हाला आज जिवंत ठेवत नाही,’ अशी धमकी दिल्याचे म्हटले आहे.