पटना मध्ये गुरुद्वाराला बॉम्बचा धोका
Marathi September 10, 2025 11:25 AM

पाटणा

बिहारची राजधानी पाटणा येथील तख्त श्री हरिमंदिर साहिब गुरुद्वाराला बॉम्बेन उडविण्याची धमकी मिळाली आहे. ईमेलद्वारे गुरुद्वारा व्यवस्थापनाला ही धमकी पाठविण्यात आली होती. गुरु लंगर कक्षांमध्ये आयईडी पेरण्यात आले असून लवकरच त्यांचा स्फोट होणार असल्याचे या ईमेलमध्ये नमूद होते. या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुद्वारामध्ये धाव घेत तपासणी केली, या तपासणीत काहीच संशयास्पद आढळून आलेले नाही

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.