बीड : गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय ३४) यांनी सोमवारी मध्यरात्री गाडीमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, त्यामागे प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद कारणीभूत असल्याची माहिती पुढे येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्यासोबत गोविंद यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, तिचा अबोला व सततचे वाद सहन न झाल्याने गोविंदने टोकाचे पाऊल उचलले, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. त्यांनी थेट पूजाच्या घरासमोर गाडी थांबवून आत्महत्या केल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
दरम्यान, गोविंद यांच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. पूजाने प्रेमसंबंधांचा गैरफायदा घेत गोविंदकडून पैसे, सोने लुबाडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तिने मिळालेल्या पैशातून नातेवाईकांच्या नावावर प्लॉट व शेती खरेदी केली. याशिवाय गेवराईतील नवे घर, शेती आपल्या नावावर करण्याची मागणी ती करत होती, अन्यथा माझ्यावर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी तिने दिल्याचाही आरोप गोविंद यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या दबावाला कंटाळूनच गोविंदने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेनंतर पूजा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात असून चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे आत्महत्येच्या दिवशीच तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तीन रील पोस्ट केल्या होत्या. त्यानंतर मात्र तिने कोणतीही पोस्ट न केल्याचे आढळले आहे. या घटनेमुळे बर्गे कुटुंबीय व गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपांच्या अनुषंगाने पूजाकडून विस्तृत चौकशी केली जात आहे.
पूजा गायकवाडचं शेवटचं रील हे एका हिंदी चित्रपटातील गाण्यावरती आहे, कृष्णा चित्रपटातील झांझरिया या रिमिक्स गाण्यावरती नाचतानाचं तिचं शेवटचं रील एक दिवसापूर्वी शेअर केलेलं आहे. यापूर्वी देखील तिने तिचे नाचतानाचे आणि इतर व्हिडीओ तिच्या सोशल मिडीयावरती शेअर केलेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या नर्तिकेचं नाव पूजा गायकवाड आहे. ही २१ वर्षी पूजा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका, सासुरे गावातील आहे. दीड वर्षांपूर्वी पूजा बार्शी तालुक्यातील थापडीतांडा या गावातील कलाकेंद्रात जात होती. येथे गोविंग बर्गे आणि पूजाची भेट झाली. यानंतर पूजा पारगाव कला केंद्राकडे वळली. यादरम्यान गोविंद आणि पूजा यांच्यातील मैत्री प्रेमात बदलली. यावेळी गोविंदने तिला पावणे दोन लाखांचा मोबाइलही भेट दिला होता. तो तिला दागिने घेऊन देत होता.
आणखी वाचा