नवी दिल्ली :
ईडीने 273 कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणूक प्रकरणाशी निगडित मनी लॉन्ड्रिंगच्या तपासाच्या अंतर्गत मंगळवारी दिल्ली आणि मध्यप्रदेशात छापे टाकले आहेत. एरा हाउसिंग अँड डेव्हलपर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (ईएचडीएल) नावाची कंपनी आणि त्याच्या प्रवर्तकांच्या विरोधात ईडीने ही कारवाई केली आहे. यात दिल्ली तसेच भोपाळ येथील एकूण 10 ठिकाणी झडती घेण्यात आली.