लेक प्रेमात पडली, बाप हैवान झाला! मुलीचा झोपेतच गळा आवळला, नंतर जे केलं ते वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल
Saam TV September 10, 2025 12:45 PM
  • जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे ऑनर किलिंगची धक्कादायक घटना.

  • वडिलांनी झोपेतच १७ वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केला.

  • खून लपवण्यासाठी मुलीला फासावर लटकवून आत्महत्येचा बनाव केला.

  • पोलिस तपासातून सत्य बाहेर आलं आणि आरोपी वडिलाला अटक झाली.

17-year-old girl strangled by father in Badnapur Maharashtra : बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना जालन्यात घडली आहे. मुलगी गावातीलच एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. याची कानकून बापाला लागली अन् त्याच्यामधील हैवान जागा झाला. १७ वर्षाची पोटची मुलगी झोपेत असतानाच तिचा नराधम बापाने जीव घेतला. त्यानंतर त्याने मुलीला घरातच फासावर लटकवलं अन् ही आत्महत्या असल्याचा बनाव केला. पण पोलिसांनी बापाच्या कृत्याचा भंडाफोड केला. एखाद्या वेब सिरीजसारखी हा प्रसंग जालन्यात बदनापूरमध्ये घडलाय. पोलिसांनी नराधम बापाच्या मुसक्या आवळल्या असून तपास सुरू आहे. ऑनर किलिंगच्या या घटनेने सगळा जालना जिल्हा हादरलाय.

गृहमंत्र्यांचा राजीनामा, २१ जणांचा मृत्यू अन् सोशल मीडियावरील बंदी उठली, नेपाळमध्ये Gen-Z चं आंदोलन पेटलं

जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील दावलवाडी गावात ५ सप्टेंबर रोजी रात्री १७ वर्षांच्या मुलीचा बापाने गळा दाबून खून केला. त्यानंतर तिचा मृत्यू आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत. बदनापूरचे पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी सांगितले की, " मुलीचे एका तरूणासोबत प्रेम संबंध होते, त्यामुळे आरोपी बाप नाराज होता. " त्याने मुलगी झोपत असतानाच गळा दाबला. त्यानंतर त्याने त्याच्या मुलीला आत्महत्या म्हणून दाखवण्यासाठी दोरीचा वापर करून छता लटकवले.

१७ वर्षांची मुलगी ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. गावातीलच एका मुलासोबत तिचे सूत जुळले अन् बापाला समजताच डोक्यात सनक घुसली. प्रेमसंबंधाच्या कारणावरून बापाने झोपेतच मुलीचा गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावलीआहे. आरोपीचे नाव हरी जोगदंड असे आहे.

ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? आमदार-नगरसेवक संपर्कात, शिंदेंच्या नेत्याचा दावा

हरी जोगदंड त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसह एका घरात राहतो. तर त्याची मोठी मुलगी दुसऱ्या घरात तिच्या आजीसोबत राहत होती. ५ सप्टेंबर रोजी जोगदंड मुलीच्या खोलीत गेला अन् झोपेतच तिचा गळा आवळला. त्यानंतर फासावर लटकवलं. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली असता संशयआला. त्यानंतर पोस्टमार्टममधून तिची गळा दाबून हत्या केली. त्याला ताब्यात घेतलं अन् चौकशी केली असता आरोपीने मुलीची हत्या केल्याचे कबूल केलं. कोर्टाने आरोपी बापाला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास कऱण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.