चिंचवड, ता.९ ः गणेशनगर येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुलात रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
रोटरी क्लब अध्यक्ष भरत चव्हाण, सचिव वसंत ढवळे, मुख्याध्यापिका आशा हुले, अश्विनी बाविस्कर यांच्या हस्ते बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक विभागातील ३० पेक्षा अधिक शिक्षक-शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी चव्हाण यांनी गुरु म्हणजे केवळ शालेय शिक्षक नव्हे; तर आयुष्याचा मार्गदर्शक असतो, असे सांगत शिक्षकांचे विश्वातील महत्त्व अधोरेखित केले. सचिव वसंत ढवळे यांनी शिक्षकांचा समाजातील वाटा स्पष्ट केला. रेश्मा बोरा यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. गोविंद जगदाळे यांनी शाळेला वृक्ष भेट देऊन‘प्लास्टिक मुक्त भारत’चा संदेश दिला. सुनीता घोडे यांनी स्वागत केले. मनीषा वाघ यांनी सूत्रसंचालन केले.
CWD25A02007