एस.बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
esakal September 10, 2025 12:45 PM

पिंपरी, ता. ९ : दिग्गज हॉकीपटू ध्यानचंद यांचा जन्मोत्सव हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित एस.बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पद्मश्री शीतल महाजन यांच्यासह प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, क्रांती कुलकर्णी, सुजाता भोईटे, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी, प्रशासकीय व्यवस्थापक मनीष ढेकळे आदी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉक्टर गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
‘‘दुर्दम्य आत्मविश्वास आणि आप्तेष्टांचा पाठिंबा हेच खरे यशाचे गमक आहे. खरी क्रीडा भावना क्षेत्र आणि आखाड्यांच्या पलीकडे जाते. ज्यामध्ये धैर्य, महत्त्वाकांक्षा आणि असाधारण ध्येयांचा पाठलाग यांचा समावेश आहे,’’ असे मार्गदर्शन महाजन यांनी यावेळी केले.
मुख्याध्यापिका आणि उपप्राचार्यांशी संवाद साधल्यानंतर महाजन यांनी त्यांचा साहसी प्रवास आणि आवड सांगितली. त्यांच्या कामगिरीचा नऊ मिनिटांचा व्हिडिओ दाखवण्यात आला, ज्यामध्ये प्रत्येक उल्लेखनीय कामगिरीचे प्रत्यक्ष वर्णन केले गेले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गाणी, नृत्य आणि मार्शल आर्टस् या माध्यमातून कलागुणांचे सादरीकरण केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.