रोहित शर्मा, विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार का? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स; India A कडून खेळण्याचा अद्याप निर्णय नाही
esakal September 10, 2025 12:45 PM
  • रोहित शर्मा (३७) व विराट कोहली (३६) यांनी कसोटीतून निवृत्ती घेतली असून वन डे वर्ल्ड कप २०२७ खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

  • प्रशिक्षक गौतम गंभीर युवा खेळाडूंना संधी देत असल्याने रोहित-कोहलींचे स्वप्न पूर्ण होईल का यावर शंका आहे.

  • भारताचा अ संघ ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध कानपूरमध्ये ३ वन डे सामने खेळणार आहे, पण रोहित-कोहली यात सहभागी होण्याची शक्यता कमी आहे.

BCCI Provides Big Update on Rohit and Kohli Ahead of Australia Tour : रोहित शर्मा व विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हा भविष्याचा विचार करून टीम इंडियात सातत्याने बदल करतोय आणि युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी देतोय. रोहित व विराट यांच्या कसोटीतून निवृत्तीमागे हेच कारण असल्याची दबकी चर्चा आहे. मागच्या वर्षी वर्ल्ड कप उंचावल्यानंतर दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर कसोटी व वन डे क्रिकेट हेच त्यांचे ध्येय होते, परंतु इंग्लंड दौऱ्यापूर्वी बरंच काही घडलं अन् दोघांनी कसोटीलाही रामराम केला.

३७ वर्षीय रोहित व ३६ वर्षीय विराटयांना २०२७ मध्ये होणारा वन डे वर्ल्ड कप खेळायचा आहे आणि तशी इच्छा त्यांनी व्यक्तही केली आहे. पण, गंभीर ज्या पद्धतीने काम करतोय, ते पाहता रोहित, विराटचे स्वप्न पूर्ण होईल की नाही. ही शंका आहे. त्याची स्पष्टता चाहत्यांना आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातूनच येणार आहे. भारतीय संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी जाणार आहे. या दौऱ्यासाठी रोहित व विराट यांची निवड होते का? हा प्रश्न सतावतोय.

Dhanashree Verma : मी ठरवलं असतं तर युझवेंद्र चहलची अब्रू चव्हाट्यावर आणली असती; धनश्री वर्माचा खळबळजनक Video

भारताचा अ संघ त्याआधी कानपूर येथे ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित व विराट यांनी फिटनेस टेस्ट पास केली असली तरी ते भारत अ संघाकडून खेळतील अशी चर्चा होती. पण, बीसीसीआयने या विषयावर कोणतीच चर्चा झाली नसल्याचे आज स्पष्ट केले. ३० सप्टेंबर, ३ ऑक्टोबर व ५ ऑक्टोबर या तारखांना कानपूरच्या ग्रीन पार्कवर IND A vs AUS A ODI सामने होतील.

रोहित व विराट यांना ही मालिका खेळण्यास कोणतीच जबरदस्ती केली जाणार नाही आणि त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी सराव करायचा असेल, तर ते ऑस्ट्रेलिया अ विरुद्धची मालिका खेळू शकतात. दोन्ही सीनियर खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध आहेत आणि रोहितच्या नेतृत्वाखाली संघ खेळेल, असे अपडेट्स समोर आले आहे.

Asia Cup 2025: संजू सॅमसनसोबत तिसऱ्या दिवशी नेट प्रॅक्टिसमध्ये काय घडलं? IND vs UAE सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळणार संधी

'रोहित व विराट भारत अ संघाकडून तीन सामने खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही किंवा चर्चाही झालेली नाही. त्यांना ही मालिका खेळाच, अशी जबरदस्ती केली जाणार नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी त्यांना खेळायचे असेल तर ते भारत अ संघाकडून एक किंवा दोन सामने खेळतील. पण, अद्याप काही ठरलेले नाही. ते दोघंही तंदुरुस्त आहेत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उपलब्ध आहेत,'असे बीसीसीआयचे सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.

त्यांनी पुढे सांगितले की, भारत अ संघ आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीचा भारतीय संघ जाहीर करण्यापूर्वी निवड समिती इराणी चषक स्पर्धेसाठीच्या संघाची घोषणा करतील. निवड समितीतील काही सदस्या दुलीप चषक स्पर्धेची फायनल पाहायला जातील. अजित आगरकर दुबईत असतील.

Rohit Sharma Video : रोहित शर्मा मध्यरात्री कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये; कारण काय? Viral Video ने वाढवली चाहत्यांची धडधड
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.