24 तासांत नेपाळमधील सरकार उलथवून टाकणारा Gen Z आंदोलकांचा नेता सुदान गुरुंगची हिस्ट्री...
Sarkarnama September 11, 2025 05:45 AM
Nepal Protest 2025 | Social Media Ban | Gen Z Sudan Gurung सोशल मिडिया बंदी

नेपाळ सरकारने फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसह 26 सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातल्यामुळे युवकांचा संताप अनावर झाला आहे.

Nepal Protest 2025 | Social Media Ban | Gen Z Sudan Gurung आंदोलन

संतापलेल्या तरूणांनी नेपाळमध्ये मोठं आंदोलन उभारलं ज्याला हिंसक वळण लागलं असून त्याची झळ खुद्द देशाच्या पंतप्रधानांना बसली आहे.

KP Sharma Oli resignation के. पी. शर्मा ओली

कारण या आंदोलनानंतर नेपाळमधील 10 मंत्र्यांसह पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

Nepal Protest 2025 | Social Media Ban | Gen Z Sudan Gurung जेन-झी

तरुणांनी सरकारविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाला Gen Z नाव देण्यात आलं. आंदोलनानंतर काही तासांतच सोशल मीडियावरील बंदीचा निर्णय मागे घेण्यात आला.

Nepal Protest 2025 | Social Media Ban | Gen Z Sudan Gurung हिंसाचार

मात्र, या आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू तर 300 हून अधिक लोक जखमी झालेत.

Nepal Protest 2025 | Social Media Ban | Gen Z Sudan Gurung आंदोलनाचा जनक

मात्र, नेपाळ मधील या आंदोलनाचा जनक नेमका कोण आहे आणि कुणाच्या सांगण्यावरून तरुणाई रस्त्यावर उतरली? याबाबतची माहिती जाणून घेऊया.

Nepal Protest 2025 | Social Media Ban | Gen Z Sudan Gurung सुदान गुरुंग

नेपाळमध्ये अवघ्या 24 तासांत सत्तातर घडवून आणण्यास सुदान गुरुंग नावाचा 36 वर्षांचा तरूण कारणीभूत ठरला आहे.

Nepal Protest 2025 | Social Media Ban | Gen Z Sudan Gurung

'हामी नेपाल' सुदान गुरुंग हाच जेन-झी आंदोलकांचा नेता असून तो 'हामी नेपाल' या संघटनेचा अध्यक्ष आहे. तो पूर्वी केवळ एक कार्यक्रम आयोजक होता.

Nepal Protest 2025 | Social Media Ban | Gen Z Sudan Gurung आपत्ती निवारण

2015 सालच्या भूकंपात सुदानचा मुलगा मरण पावला. त्यानंतर तो आपत्ती निवारणाच्या कामात सहभागी होऊ लागला.

Nepal Protest 2025 | Social Media Ban | Gen Z Sudan Gurung 'घोपा कॅम्प'

धारण येथील बी. पी. कोइराला आरोग्य विज्ञान संस्थेतील पारदर्शक कारभारासाठी त्याने आंदोलन उभारलं होतं. याच 'घोपा कॅम्प' आंदोलनामुळे तो फेमस झाला.

Prajwal Revanna Rape Case NEXT : बलात्कार प्रकरणी जन्मठेप झालेला माजी खासदार प्रज्वल रेवन्नाची तुरुंगात लिपिक म्हणून नियुक्ती, दिवसाला मिळतो 'इतका' पगार क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.