वास्तुनुसार पितृपक्षात पूर्वजांच्या फोटोजवळ 'या' 3 गोष्टी ठेवा, पूर्वज होतील प्रसन्न
Tv9 Marathi September 11, 2025 05:45 AM

हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप महत्व आहे. असे मानले जाते की, पितृपक्षात आपले पूवर्ज पृथ्वीवर येतात. म्हणून या दिवसांमध्ये पिंडदान, तर्पण, श्राद्ध असे विधी करत असतो. तर या दिवसांमध्ये काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर घरातील वातावरण बिघडते. पितृदोष निर्माण होऊ शकतो. यासाठी पितृपक्षाच्या दिवसांमध्ये पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी खूप महत्वाचा मानला जातो. या दिवसांमध्ये अनेकजण त्यांच्या पूर्वजांच्या फोटोसमोर अनेक गोष्टी ठेवतात, जेणेकरून पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते. तर या पितृपक्षात तुम्ही देखील तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी या तीन गोष्टी त्यांच्या फोटोजवळ ठेवा.

तुमच्या पूर्वजांच्या फोटोसमोर ठेवा तांब्याचा किंवा चांदीचा पाण्याचा भांडे

पूर्वजांच्या फोटो जवळ नेहमी पाण्याने भरलेले एक लहान तांबे किंवा चांदीचा तांब्या ठेवणे शुभ मानले जाते. हे पाणी शुद्धतेचे प्रतीक आहे आणि ते वातावरणात सकारात्मक ऊर्जा पसरवते. तुम्ही ते दररोज बदलले पाहिजे. तसेच तुमच्या पूर्वजांच्या फोटो समोर हात जोडून प्रार्थना करावी की तुमच्या घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा येऊ नये. घरात नेहमी सकारात्मकता ठेवा.

पूर्वजांच्या चित्रासमोर काळे तीळ ठेवा

वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांच्या फोटो जवळ काळे तीळ ठेवणे महत्त्वाचे मानले जाते. यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला समाधान मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबात सुख आणि समृद्धी येते. तसेच जीवनातील अडथळे कमी होतात. म्हणून, तुम्ही हे अवश्य करावे. पितृपक्षात तुम्ही हे दररोज करावे.

मातीचा दिवा लावावा

पूर्वजांच्या फोटोजवळ मातीचा दिवा लावावा. दिव्याच्या प्रकाशामुळे अंधार आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. संध्याकाळच्या वेळी तूपाचा दिवा लावणे विशेष फलदायी मानले जाते. पितृपक्षात तुम्ही तो नियमितपणे लावावा. यामुळे तुमच्यावर कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा येणार नाही. तसेच तुमचे काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होताना दिसेल.

पितृ पक्षात काय करू नये
  • स्वयंपाकघरातील भिंतीवर पूर्वजांचे फोटो अजिबात लावू नका.
  • दक्षिण दिशेव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी फोटो लावणे नेहमीच टाळा.
  • पूर्वजांचे फोटोजवळची जागा नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे.
  • बेडरूममध्ये पूर्वजांचे फोटो ठेवू नका.

वास्तुशास्त्रातील या छोट्या नियमांचे पालन केल्याने तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद तर मिळतातच, पण तुमच्या घरात सकारात्मकता, आनंद आणि शांती देखील वास करते. म्हणून तुम्हाला याची विशेष काळजी घ्यावी लागेल. तरच तुमच्या आयुष्यात कोणत्याही समस्या येणार नाहीत.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.