BMC Election: मिशन बीएमसी; शिवसेनेनं महापालिकेसाठी कंबर कसली, 21 शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
Saam TV September 11, 2025 12:45 PM
  • बीएमसी निवडणुकीसाठी शिवसेनेची जोरदार तयारी सुरू.

  • शिंदे गटानं २१ सदस्यांची मुख्य समिती स्थापन केली.

  • महायुतीला टक्कर देण्यासाठी मोठा प्लॅन आखण्यात आला

राज्यातील स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत. त्यादृष्टीनं सर्व राजकीय कामला लागले आहेत. पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम राबवले जात आहेत. तर दुसरीकडे महायुतीला जोरदार धोबीपछाड देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रणनिती तयार करण्यास सुरुवात केलीय. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे गट शिवसेनेनं मोठा प्लॅन आखलाय. शिवसेने २१ सदस्यांची समिती तयार करत निवडणुकीवर काम काम सुरू केलंय.

Maharashtra Politics: ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई? मुंबई महापालिका कोण जिंकणार?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने कंबर कसली आहे. निवडणुकीचा सारा भार संभाळण्यासाठी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी पक्षाने पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार केलीय. यात पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह २१ शिलेदारांचा समावेश करण्यात आलाय.

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर खिळे कोणी ठोकले? MSRDC नं दिलं स्पष्टीकरण

आगामी महापालिका निवडणुकीबाबतपक्षाच्या पातळीवरील सर्व महत्त्वाचे निर्णय ही समिती घेणार आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार यांना यात संधी देण्यात आली आहे. एकूण२१ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती

१) एकनाथ शिंदे, मुख्य नेते

२) रामदास कदम, नेते

३) गजानन कीर्तीकर, नेते

४) आनंदराव अडसूळ, नेते

५) मीनाताई कांबळे, नेत्या

६) डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार

७) रवींद्र वायकर, खासदार

८) मिलिंद देवरा, राज्यसभा - खासदार

९) राहुल शेवाळे, माजी खासदार

१०) संजय निरुपम, माजी खासदार

११) प्रकाश सुर्वे, आमदार

१२) अशोक पाटील, आमदार

१३) मुरजी पटेल, आमदार

१४) दिलीप लांडे, आमदार

१५) तुकाराम काते, आमदार

१६) मंगेश कुडाळकर, आमदार

१७) श्रीमती मनिषा कायंदे, विधान परिषद, आमदार

१८) सदा सरवणकर, माजी आमदार

१९) यामिनी जाधव, माजी आमदार

२०) दीपक सावंत, माजी आमदार

२१) शिशिर शिंदे, माजी आमदार

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.