Pune Crime News : पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडील-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पुण्यात एक नराधम त्याच्या अल्पवयीन मुलीवर सलग ४ महिने अत्याचार करत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या कोंढवा भागातील काकडेवस्ती या परिसरातील नराधम पित्याने स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर सलग ४ महिने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या आरोपीला गनिमी कावा संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे, संघटनेच्या महिला पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक यांनी मिळून बेदम चोप दिला.
Maharashtra Politics : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी, शिवाजी पार्कवर उद्धव यांच्यासह राजही दिसणार?स्वत:च्या पोटच्या मुलीचे शोषण करणाऱ्या नराधमाला गनिमी कावा संघटना आणि स्थानिक नागरिकांनी मिळून पोलिसांच्या हवाली केले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या गंभीर प्रकरणी स्थानिक पोलिसांनी नराधम पित्याच्या विरुद्ध पोस्को कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Donald Trump : भारतावर 100% टॅरिफ लावा... मोदींना मित्र म्हणवणाऱ्या ट्रम्पने पाठीत खंजीर खुपसलापुण्यात अघोरी विधीच्या नावाखाली महिलेला लुटलं
पुण्यामध्ये एका महिलेला लाखोंचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील सहकारनगरमध्ये राहणारी पीडित महिला जादूटोणा, अघोरी विधी यांच्या बळी पडली. महिलेला ३ लाख १५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका ३६ वर्षीय व्यक्तीच्या विरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
Jerusalem Terror Attack : राजधानीत दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार! ५ जणांचा जागीत मृत्यू, थरारक VIDEO समोर