कळंब : सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर चोरट्याचा धुडगूस वाढत चालला आहे.आठ सप्टेंबर रोजी या महामार्गावर नरसिंह साखर कारखान्याजवळ बोरी पाटी ते तेरखेडा उड्डाणंपुल दरम्यान चालत्या ट्रकची ताडपत्री फाडून माल लंपास करणाऱ्या चोरट्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मंगळवार (ता.9) सर्जिकल स्ट्राईक करत तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढी येथील सहा जणाला अटक केली असून पोलिसांनी तब्बल 11 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांकाडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानेमंगळवार (ता. 9) रोजी सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर चालत्या ट्रक ची ताडपत्री फाडून चोरटे चोरी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरलं झाला होता.या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली.
तांत्रिक तपासणी, गुप्त माहिती तसेच व्हायरल व्हिडीओच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीवरून दरोडा टाकण्याचे तयारीत असणारे अमोल नाना काळे (वय 28),किरण बापू पवार (वय 25), दत्ता दादा काळे (वय 21), सुभाष तानाजी काळे (वय 25 ),गणेश नाना काळे (वय 32 ), शिवा रामा पवार (वय 22) सर्व रा. लक्ष्मी पारधी पिढी तेरखेडा या सहा जाणाकडून दरोडा टाकण्याचे साहित्य एक स्कार्पिओ वाहन व मोबाईल सह पकडून त्यांच्याकडून 11 लाख 26 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने कारवाई केली, येरमाळा पोलिसांना का कारवाई करता आली नाही.याबाबत चर्चा असून तेरखेडा हे गाव येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. वारंवार राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांना चोरटे लुटतात.