साडी ही महिलांसाठी अतिशय जिव्हाळ्याची गोष्ट असते. सणवार, शुभ कार्य किंवा एखादा खास सण या दिवशी कपाटात ठेवलेली काढून हसखास नेसली जाते. साड्यांचे असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. पण, सिल्क साडीवर महिलांचे जरा जास्तच प्रेम दिसून येते. सिल्क साड्या जितक्या दिसायला सुंदर, चमकदार आणि आकर्षक असतात तितकेच त्याची काळजी घेणे आवश्यक असते. कारण अनेकदा वेळच्या वेळी न धुतल्याने, इस्त्री न केल्याने वापरात नसलेल्या सिल्क साड्या विरळू लागतात. त्यामुळे आज आपण अशा काही मॅजिक ट्रिक्स जाणून घेऊयात ज्यामुळे वर्षानुवर्षे तुमच्या महागातल्या सिल्क साड्या तश्याच्या तशाच राहतील.
- सिल्क साड्यांना किड्यांपासून वाचवण्यासाठी साड्यांमध्ये नॅप्थडलिनच्या गोळ्या ठेवाव्यात.
- नॅप्थॉलिनच्या गोळ्या ठेवताना साडीत थेट गुंडाळून न ठेवता पेपरमध्ये गुंडाळून ठेवाव्यात.
- परफ्यूमची बाटली साडीच्या आसपास चुकूनही ठेवू नये. यामुळे साडी खराब होते.
हेही वाचा – DIY Hair Bun: जुन्या ब्रा पॅडचा भन्नाट वापर, बनवा स्टायलिश हेअर बन घरच्या घरी
- कडुलिंबाच्या पानांची पावडर तयार करून कागदात गुंडाळावी. तयार कागदाची पूडी साडीच्या कप्प्यात ठेवावा.
- अनेकदा साडी ठेवण्यासाठी प्लास्टिकचे बॉक्स वापरले जातात. पण, त्यात सिल्कची साडी खराब होऊ शकते.
- हेवी डिझायनर सिल्क साडी सुती कापडात गुंडाळून कपाटात ठेवावी.
- साडीला पुरेशी हवा लागेल अशा ठिकाणी साड्या ठेवाव्यात.
- दर 4 ते 5 महिन्यांनी साडीची घडी बदलावी.
- हळदीत ऍटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे किटकांपासून तुमच्या साड्यांचे संरक्षण करू शकता. अशा वेळी तुम्ही सिल्कच्या साड्यांमध्ये हळदीचा बंडल ठेवू शकता.
- कापूर रेशमी साड्यांचे किटकनाशकांपासून संरक्षण करतो. यासाठी कापूर पावडर कापडात गुंडाळून साड्यांमध्ये ठेवू शकता.
हेही वाचा – Rice Flour For Skin: तांदळाचे पीठ त्वचेसाठी बेस्ट टॉनिक; चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्लो