आयटीआर फाईलिंग अंतिम मुदत नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर आहे. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी मुदतवाढ मिळणार की नाही अशा चर्चा देखील सुरु आहेत. मात्र, आयकर विभागानं आतापर्यंत मुदतवाढ दिली जाणार की नाही याबाबत माहिती दिली आहे. आयकर विभागानं शनिवारी एक पोस्ट करुन माहिती दिलीय. आतापर्यंत 6 कोटी पेक्षा अधिक लोकांनी आयकर रिटर्न भरल्याची माहिती देण्यात आली आहे.
दुसऱ्या बाजूला आयटीआर फाईल करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत मागणी सरकारकडे आणि आयकर विभागाकडे करत आहे. आयकर विभागनं सर्व लोकांना आवाहन केलंय की ज्यांनी 2025-26 असेसमेंट ईयरसाठी आयटीआर फाईल केला नसेल त्यांनी तो दाखल करावा. अखेरच्या वेळी येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी लवकरात लवकर आपला रिटर्न दाखल करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
इन्कम टॅक्स विभागानं एक्स सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिलेली आहे. त्यात म्हटलंय की करदाते आणि टॅक्स प्रोफेन्शल्सचे धन्यवाद मानले आहेत. आतापर्यंत 6 कोटी आयटीआर फाईल झाले आहेत, ही संख्या वाढत आहे त्यांना आयकर विभागानं धन्यवाद दिले आहेत. आयटीआर भरण्यासाठी आणि याबाबतच्या सेवांसाठी हेल्पडेस्क चोवीस तास काम करत आहे. या वर्षी अपडेटेड आयटीआर फॉर्म जारी होण्यात उशीर झाल्यानं नॉन ऑडिट रिटर्न फाईल करण्यासाठी मुदत 31 जुलै पासून वाढवून 15 सप्टेंबर करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत फाईल झालेल्या आयटीआरची संख्या कमी आहे. 31 जुलै 2024 पर्यंत 7.6 कोटी आयटीआर जमा झाले होते. 13 सप्टेंबरपर्यंत ही संख्या 6 कोटींवर पोहोचली आहे.
कर्नाटक राज्य चार्टर्ड अकाऊंटट्स असोसिएशन , आयसीएआयची सेंट्रल इंडिया रिजनल काऊन्सिल आणि ॲडवोकेटस टॅक्स बार असोसिएसन सह इतर संस्थांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाला पत्र लिहून पोर्टलवरील अडचणी, सेवांमधील दिरंगाई, देशातील काही भागात असलेली पूरस्थिती, सणांचा कालावधी पाहता मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती.काही कर विशेषतज्ज्ञ देखील सोशल मीडियावर फायलिंग करण्यात येणाऱ्या अडचणी वाढत आहेत. मात्र, आयकर विभागाकडून मुदतवाढ देण्याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
आणखी वाचा