बीजगोळेनिर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरणसंवर्धन, रक्षणाचा संदेश
esakal September 14, 2025 02:45 AM

बीजगोळेनिर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरणसंवर्धनाचा संदेश
डोंबिवली, ता.१३ (बातमीदार) ः उल्हासनगर पालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या संकल्पनेतून शहरातील हरितक्षेत्र वाढविण्यासाठी पालिका पर्यावरण विभाग व एसएसटी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बीजगोळे (सीडबॉल्स) तयार करण्यात आले आहेत. पर्यावरण संरक्षण व संवर्धन या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या सहभागातून बीजगोळेनिर्मिती करून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे.
या बीजगोळ्यांचा उपयोग शहर परिसरातील हरितक्षेत्र वाढविण्यास होणार आहे. या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक (एनएसएस युनिट) आणि पर्यावरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. या पर्यावरण संरक्षणासाठी योगदान देण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.