>> नीलिमा प्राचार्य
जाळीदार अडचणींवर मात कराल
मेषेच्या पंचमेषात शुक्र, षष्ठेशात बुध, रवि. मानसिक संतुलन नीट ठेवून अडचणींवर मात करा. यश प्राप्त होईल. डावपेचांची घाई नको. कामात चूक टाळा. धंद्यात गोड बोला. करार नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संयम बाळगा.
चांगला दिवस 14, 15
वृषभ – योजनांना गती मिळेल
वृषभेच्या सुखेषात शुक्र, पंचमेषात बुध, रवि. प्रत्येक दिवस महत्त्वाचा. दिग्गज व्यक्तींचा परिचय होईल. आत्मविश्वासात भर पडेल. नोकरीत कौतुक होईल. नवे कंत्राट मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना गती मिळेल?
चांगला दिवस 14, 16
मिथुन – नोकरीत काम वाढेल
मिथुनेच्या पराक्रमास शुक्र, सुखस्थानात बुध, रवि. तुमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होईल. कुशलतेने यश मिळेल. नोकरीत काम वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अविश्वास दाखवला जाईल. दूरदृष्टिकोन ठेवा.
चांगला दिवस 17, 18
कर्करोग रागावर ताबा ठेवा
कर्केच्या धनेषात शुक्र, पराक्रमात बुध, रवि. रागावर नियंत्रण ठेवा. यश मिळवाल. प्रवासात घाई नको. दुखापत टाळा. नोकरीत कामात बदल होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सावध रहा. प्रतिष्ठा वाढेल. योजना पूर्ण करा.
चांगला दिवस 17, 18
सिंह –रेंगाळलेली कामे करा
स्वराशीत शुक्र, सिंहेच्या धनेषात बुध, रवि. आत्मविश्वास, उत्साह वाढेल. रेंगाळलेली कामे पूर्ण करा. नोकरीत प्रगती होईल. चांगली घटना घडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुंता सोडवाल. दिग्गजांची भेट होईल.
चांगला दिवस 14, 15
कन्या उतावळेपणा टाळा
कन्येच्या व्ययेषात शुक्र, स्वराशीत बुध, रवि. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. अतिउत्साह व उतावळेपणा टाळा. चांगल्या संधीची वाट पहा. नोकरीत दगदग होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात निर्णयाची घाई नको. दिशाभूल होईल.
चांगला दिवस 17, 18
तूळ – महत्त्वाची कामे करा
तुळेच्या एकादशात शुक्र, व्ययेषात बुध, रवि. सप्ताहाच्या सुरूवातीला महत्त्वाची कामे करा. नोकरीत प्रश्न मार्गी लावा. नवीन ओळख महत्त्वाची ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चर्चा होतील. लोकसंग्रह वाढवा?
चांगला दिवस 15, 16
वृश्चिक – निर्णयात सावधगिरी
वृश्चिकेच्या दशमेषात शुक्र, एकदशात सूर्य, बुध. इतरांच्या प्रश्नावर निर्णय देताना सावध रहा. नोकरीत प्रभाव राहील. दुखापत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चर्चा यशस्वी ठरली तरी साशंकता राहील. प्रकृतीची काळजी घ्या?
चांगला दिवस 14, 17
धनु – भावनिक गुंता टाळा
धनुच्या भाग्येषात शुक्र, दशमेषात बुध, रवि. क्षेत्र कोणतेही असो भावनिक गुंता वाढू देऊ नका. मोह टाळा. धंद्यात व्यवहार कुशलता बाळगा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा राहील. कठीण कामात यश मिळेल?
चांगला दिवस 15, 16
मकर प्रश्नांवर मार्ग शोधा
मकरेच्या अष्टमेषात शुक्र, भाग्येषात बुध, रवि. किचकट प्रश्नावर मार्ग शोधा. योग्य संधीची वाट पहा. नोकरीत तणाव दूर ठेवा. तडजोड करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांकडून आश्वासन मिळेल. प्रतिमा उंचावेल?
चांगला दिवस 15, 17
कुंभ – किचकट कामे करा
कुंभेच्या सप्तमेषात शुक्र, अष्टमेषात बुध, रवि. किचकट कामे करून घ्या. नोकरीत चातुर्य उपयोगी पडेल. धंद्यात हिशेब तपासा. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संवाद साधताना वाद टाळा. व्यवहारात सावध रहा?
चांगला दिवस 15, 16
मीन – प्रकृतीकडे लक्ष द्या
मीनेच्या षष्ठेशात शुक्र, सप्तमेषात बुध, रवि. योग्य संधीची वाट पहा. प्रवासात सावध रहा. दुखापत टाळा. प्रकृतीकडे लक्ष द्या. नोकरी टिकवा. धंद्यात गैरसमज होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संयम बाळगा. संधीची वाट बघा.
चांगला दिवस 14, 17