पंचवटी: येथील रामवाडीतील आदर्श नगर परिसरात भरदिवसा दोन संशयितांनी पाणी पिण्याचा बहाणा करत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
नंदिनी नारायण नायक (वय ६५, रा. श्रद्धा पार्क, आदर्श नगर, रामवाडी, पंचवटी, नाशिक) या खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करतात. शुक्रवारी (ता.१२) दुपारी चार ते पाचच्या दरम्यान कामकाज उरकून त्या घरी परतल्या. घरात दळणाचा डबा व पिशवी ठेवत असतानाच दोन अज्ञात संशयितांनी घराजवळ येऊन भाडेकरूविषयी चौकशी केली व पिण्यासाठी पाणी मागितले.
नायक यांनी त्यांना पाणी दिल्यानंतर रिकामा ग्लास परत करताना एका संशयिताने अचानक त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. त्यांनी प्रतिकार केला; मात्र, अर्धी सोनसाखळी घेऊन आरोपी पळून गेले. घटनेनंतर नंदिनी नायक यांनी तत्काळ मुलीस माहिती दिली व थेट पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा नोंदवला.
या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांत संतापाची लाट आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रकार सीसीटीव्हीत कैद
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. यात आरोपींनी केलेला हल्ला व महिलेकडून झालेला प्रतिकार स्पष्ट दिसून येतो.पंचवटी, ता. १२ : येथील रामवाडीतील आदर्श नगर परिसरात भरदिवसा दोन संशयितांनी पाणी पिण्याचा बहाणा करत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
नंदिनी नारायण नायक (वय ६५, रा. श्रद्धा पार्क, आदर्श नगर, रामवाडी, पंचवटी, नाशिक) या खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करतात. शुक्रवारी (ता.१२) दुपारी चार ते पाचच्या दरम्यान कामकाज उरकून त्या घरी परतल्या.
घरात दळणाचा डबा व पिशवी ठेवत असतानाच दोन अज्ञात संशयितांनी घराजवळ येऊन भाडेकरूविषयी चौकशी केली व पिण्यासाठी पाणी मागितले. नायक यांनी त्यांना पाणी दिल्यानंतर रिकामा ग्लास परत करताना एका संशयिताने अचानक त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. त्यांनी प्रतिकार केला; मात्र, अर्धी सोनसाखळी घेऊन आरोपी पळून गेले. घटनेनंतर नंदिनी नायक यांनी तत्काळ मुलीस माहिती दिली व थेट पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा नोंदवला.
Court News: प्रेमातील शारीरिक संबंध बलात्कार नाहीत; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, नेमकं प्रकरण काय?या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांत संतापाची लाट आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रकार सीसीटीव्हीत कैद
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. यात आरोपींनी केलेला हल्ला व महिलेकडून झालेला प्रतिकार स्पष्ट दिसून येतो.