मुंबई : गर्दी कमी करण्यासाठी आणि पश्चिम घाटातील सह्याद्री अभयारण्यात पुन्हा लोकसंख्या निर्माण करण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ताडोबा-अंधारी आणि पेंच अभयारण्यांमधून ८ वाघांचे स्थलांतर सह्याद्री अभयारण्यात केले जाणार आहे. तसेच या निर्णयाला केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वन्यजीव व्यवस्थापनाच्या उपक्रमात ताडोबा-अंधारी आणि पेंच अभयारण्यांमधून पाच मादी आणि तीन नर असे आठ वाघ पश्चिम घाटातील कमी लोकसंख्या असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित केले जातील.विदर्भातील वारंवार होणारे प्रादेशिक संघर्ष आणि मानव-प्राणी संघर्ष कमी करणे तसेच त्याचबरोबर सह्याद्रीला एक व्यवहार्य वाघ अधिवास म्हणून पुन्हा स्थापित करण्यासाठी या निर्णयाला मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
Thane News: जिल्हा परिषदांचे पडघम! ठाण्याची धुरा महिलेच्या खांद्यावर, अध्यक्षपद महिलेसाठी राखीव वाघांच्या स्थलांतरामागील कारणताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ९५ वाघ आहेत, तर चंद्रपूर जिल्ह्यात आणखी २५० वाघआहेत. गर्दीमुळे या प्राण्यामध्ये एकमेकांवर हल्ले होत असल्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या आठवड्यात अशाच एका प्रकरणात एका वाघाचा मृत्यू झाला आणि दुसरा गंभीर जखमी झाला. त्यामुळे काही वाघांचे स्थलांतर केल्याने या प्रदेशावरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.
वन उपमहानिरीक्षकांचे पत्रया संदर्भात, वन उपमहानिरीक्षक (WL), डॉ. सुरभी राय यांनी महाराष्ट्र वन विभागाच्या मुख्य वन्यजीव रक्षकांना पत्र लिहिले आहे. पत्रात असे म्हटले आहे की वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या कलम १२ अंतर्गत तरतूद (अ) नुसार TATR आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून आठ वाघ (तीन नर आणि पाच मादी) STR मध्ये पकडण्यासाठी ही मंजुरी देण्यात आली आहे.
Mumbai News: खड्ड्यांप्रकरणी भरपाई देण्यास तयार राहा, उच्च न्यायालयाकडून मुंबई महापालिका धारेवर वन मंत्रालयाची अटमात्र पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने काही अटी घातल्या आहेत ज्यामध्ये असे म्हटले आहे की, स्थलांतर करणे हे राज्य वन विभागाच्या देखरेखीखाली काटेकोरपणे केले जाईल. वेळोवेळी पशुवैद्यकीय काळजी घेतली जाईल. तसेच संपूर्ण ऑपरेशन दरम्यान वाघांना कमीत कमी दुखापत होईल याची खात्री केली जाईल.