अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावात दुर्दैवी घटना घडली.
अपघातात आदित्य व्हनमाने या तरुणाचा मृत्यू झाला.
अंत्यसंस्कारावेळी धक्क्याने आजी जनाबाई यांचाही मृत्यू झाला.
दुहेरी अंत्यसंस्कारामुळे गावात हळहळ व शोककळा पसरली आहे.
आजी म्हणजे नातवंडांची दुसरी मैत्रीणच. मात्र याचं नात्याबद्दल मन पिळवटून टाकणारी घटना घडली आली आहे. अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावात एकाच दिवशी नातवाचा अपघाती मृत्यू झाला. नातवाला निरोप देताना त्याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळी आजीने प्राण सोडल्याची घटना घडली आहे. एकाच दिवशी एका घरात दोघांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसारली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हन्नूर गावातील भीमाशंकर माळप्पा व्हनमाने हे वाहन चालक म्हणून काम करतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा, मुलगी आणि वयोवृद्ध आई असे त्यांचे कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबातील आदित्य व्हनमाने, हा चपळगाव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालयात नववीत शिकत होता. बुधवारी शाळा सुटल्यानंतर आदित्य घरी जाण्यासाठी एका दुचाकीस्वाराला गावाकडे सोडण्याची विनंती करत होता.
Akkalkot: अक्कलकोट तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले, ओढ्याला पूर | VIDEOदुचाकीवर बसून तो निघाला होता, पण अचानक त्या गाडीतील पेट्रोल संपले. त्यानंतर दोघे पेट्रोल भरून पुन्हा निघाले असता समोरून आलेल्या एका कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला, तर आदित्यचा जागीच मृत्यू झाला. आदित्यचा मृतदेह गावात आणल्यानंतर कुटुंबीयांवर शोककळा पसरली.
Akkalkot News : पुराच्या पाण्यातून दुचाकी काढणे जीवावर बेतले; बोरी नदीच्या पुरात शेतकरी गेला वाहूनस्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जेव्हा सर्व मंडळी जमली, तेव्हा आदित्यची आजी जनाबाई व्हनमाने यांनी हा प्रसंग पाहिला. आपल्या नातवाचा मृतदेह पाहून त्या असहाय झाल्या आणि जागीच कोसळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र नातवाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Akkalkot Tourism: वीकेंड प्लॅन करा अक्कलकोटमध्ये! 'ही' 5 ठिकाणं तुमचं मन जिंकतीलएकाच दिवशी नातवाचा आणि आजीचा मृत्यू झाल्याने हन्नूर गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. हन्नूर स्मशानभूमीत नातवाचा आणि आजीचा अंत्यसंस्कार एकत्र करण्यात आला. एकाच दिवशी एका घरातील आजी आणि नातवाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.