अनेक आपण दंतकथांमध्ये ऐकले की झाडातून पैशांचा पाऊस पडला आहे. पण ही घटना खऱ्या आयुष्यात घडली तर? वाचूनच आनंद होतो ना. खरंतर अशीच एक घटना एका गावात घडली आहे. या गावात चक्क झाडातून पैशांचा पाऊस पडला आहे. पडलेले पैसे उचलण्यासाठी गावकऱ्यांती तुफान गर्दी केली होती. आता खरच हे शक्य आहे का? चला जाणून घेऊया नेमकं घडलं तरी काय होतं?
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमधील मौदहा गावात झाडातून पैशांचा पाऊस पडला आहे. हा चत्मकार जेव्हा झाला तेव्हा संपूर्ण गावकरी तेथे पैसे गोळा करण्यासाठी आले होते. पण हा चमत्कार खरं तर माकडांनी घडवून आणला आहे. त्यांनी एका दुकानातून पैशांनी भरलेली पिशवी चोरली होती. ती पिशवी घेऊन ते झाडावर चढले आणि तेथून पैसे खाली फेकू लागले. रस्त्यावरून जाणाऱ्या गावकऱ्याला झाडावरून पैशांचा पाऊस पडत असल्याचे जाणवले. त्यानंतर पैसे गोळा करण्यासाठी अनेक गावकरी तेथे जमले.
वाचा: तुफान ट्रेंडिंग असणारा विंटेज फोटो कसा तयार करायचा? फक्त या स्टेप्स करा फॉलो, काम झालंच म्हणून समजा!
गावऱ्यांनी झाडाखालील पैसे गोळा करण्यास गर्दी केली. लोकांमध्ये पैसे उचलण्याची चढाओढ सुरु झाली होती. पण या मुळे दुकानदाराचे मोठे नुकसान झाले. माकडांनी दुकनदाराचे सुमारे 11 हजार रुपये चोरले होते. ते पूर्ण पैसे त्यांनी झाडावरुन खाली फेकले. ही घटना हमीरपूरच्या मौदहा कोतवाली क्षेत्रातील थाना चौकाजवळील मराठीपूर येथे घडली.
मराठीपूर येथील रहिवासी बाल गोपाल हे फुटपाथवर पूजा-पाठाची सामग्री विकण्याचे दुकान लावतात. त्यांच्या दुकानावर माकडांचा कळप आला आणि एका माकडाने दुकानदाराची पैशांची पिशवी घेतली. त्यानंतर ते माकड झाडावर जाऊन बसले. त्या पिशवीमध्ये 10 हजार 800 रुपये होते. त्यानंतर माकडांनी एक-एक करत सर्व झाडावरून खाली फेकल्या. झाडावरुन पडणाऱ्या नोटा पाहून गावकऱ्यांनी गर्दी केली.
एक तास पैशांचा पाऊस
झाडावरून पैशांचा पाऊस पाहून जमलेल्या लोकांनी याचा फायदा घेतला आणि ज्याच्या हाती जेवढे पैसे आले, तेवढे घेऊन ते निघून गेले. काही लोक माकडांच्या या कृतीकडे बघत उभे राहिले. या दरम्यान काही लोकांनी दुकानदाराला पैसे गोळा करण्यास मदत केली, पण यामुळे तिथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे वाहतूकही प्रभावित झाली. नंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी वाहतूक सुरू केली. सुमारे एक तास माकडांनी पेडावरून पैशांचा पाऊस पाडला. या पैशांच्या पावसात काही लोकांना खूप मजा आली आणि ते पैसे उचलून घेऊन गेले. पण यामुळे दुकानदाराचे मोठे नुकसान झाले. आपल्या मेहनतीच्या कमाईचा पाऊस पाहून दुकानदाराच्या डोळ्यातून अश्रू आले. काही लोकांनी दुकानदाराला मदत केली, पण बहुतांश लोक दुकानदाराचे पैसे उचलून पळाले. त्यामुळे दुकानदाराला 11 हजारांपैकी फक्त 6 हजार रुपये मिळाले.