तमिळ थलायवाजचा कर्णधार पवन सेहरावत शिस्तभंगामुळे प्रो कबड्डीच्या १२ व्या हंगामातून बाहेर झाला आहे.
संघाने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.
पवनने यंदाच्या हंगामात तीन सामने खेळले होते.
प्रो कबड्डीचा १२ व्या हंगामातील जयपूर लेगला सुरुवात झाली आहे. अशातच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. तमिळ थलायवाज संघाचा कर्णधार पवन सेहरावत यंदाच्या हंगामातून बाहेर झाला आहे. तमिळ थलायवाजयने याबाबत शनिवारी (१३ सप्टेंबर) स्पष्टीकरण दिले आहे. तमिळ थलायवाजने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली आहे.
Vikas Jadhav Exclusive: 'आई म्हणायची, तू तिथं कधी दिसणार?' प्रो कबड्डीमध्ये नाव कमावण्यास सज्ज असलेल्या विकासची गोष्टथलायवाजने दिलेल्या माहितीनुसार पवन सेहरावतवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून त्याला घरी परत पाठवण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे तो उर्वरित हंगामात सहभाग घेऊ शकणार नाही. ही प्रो कबड्डीमधील मोठी कारवाई आहे.
पवनने गेले काही हंगाम गाजवले आहेत. अशात त्याला अशाप्रकारे हंगामातून बाहेर जावे लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, तमिळ थलायवाजने त्याला संघातून बाहेर करण्याचे स्पष्ट कारण दिलेलं नाही, मात्र त्याच्यावर शिस्तभंगामुळे कारवाई झाली असल्याचे सांगितले आहे.
तमिळ थलायवाजने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की 'शिस्तभंगाच्या कारणाने पवन सेहरावतला घरी पाठवण्यात आले असून तो आता उर्वरित हंगामात संघाचा भाग नसेल. हा निर्णय सखोल विचार करून आणि संघाच्या आचारसंहितेच्या नुसार घेण्यात आला आहे.'
गेल्या दोन हंगामात तेलुगु टायटन्सकडून खेळल्यानंतर पवन तमिळ थलायवाजसंघात परतला होता. त्याने चालू हंगामात पहिले तीन सामने खेळला होता. त्याने २२ रेड पाँइंट्सही मिळवले होते.
मात्र तो शुक्रवारी जयपूर लेगमध्ये झालेल्या तमिळ थलायवाजच्या पहिल्या सामन्यात खेळला नव्हता. या सामन्यात तमिळ थलायवाजने बंगाल वॉरियर्सचा ४६-३६ अशा फरकाने पराभव केला होता. या सामन्यात अर्जुन देशवालने नेतृत्व करताना १७ पाँइंट्स मिळवले होते.
दरम्यान, जेव्हा तमिळ थलायवाज संघ जयपूरला आला, त्यावेळीही पवन संघात न दिसल्याने चर्चा सुरू झाल्या होत्या. पण अखेर आता संघाकडूनच याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तमिळ संघाने आत्तापर्यंत ४ सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत, तर दोन पराभूत झाले आहेत.
Pro Kabaddi 12: यु मुम्बाची ताकद डिफेन्स की रेडिंग? कर्णधार सुनील कुमारने उलगडले रहस्य; पुणेरी पलटणबद्दल म्हणाला...पवन सेहरावतने आत्तापर्यंत प्रो कबड्डीमध्ये १४२ सामने खेळले असून १४१० पाँइंट्स मिळवले आहेत. त्याने रेडिंगमध्ये १३४० पाँइंट्स मिळवले आहेत, तर ७० पाँइंट्स टॅकलचे आहेत.
FAQsप्र.१. पवन सेहरावतला संघातून का काढले?
उ. शिस्तभंगाच्या कारणास्तव तमिळ थलायवाजने त्याला प्रो कबड्डीच्या १२ व्या हंगामातून बाहेर केले.
(Why was Pawan Sehrawat released from Tamil Thalaivas?)
प्र.२. पवन सेहरावत प्रो कबड्डीच्या किती सामन्यांत खेळला आहे?
उ. त्याने आत्तापर्यंत १४२ सामने खेळले असून १४१० पॉइंट्स मिळवले आहेत.
(How many PKL matches has Pawan Sehrawat played?)
प्र.३. १२ व्या हंगामात पवनने किती रेड पॉइंट्स मिळवले?
उ. चालू हंगामातील पहिल्या ३ सामन्यांत त्याने २२ रेड पॉइंट्स मिळवले.
(How many raid points did Pawan score this season?)
प्र.४. पवनच्या अनुपस्थितीत तमिळ थलायवाजचे नेतृत्व कोणी केले?
उ. अर्जुन देशवालने बंगाल वॉरियर्सविरुद्ध संघाचे नेतृत्व केले.
(Who led Tamil Thalaivas in Pawan’s absence?)
प्र.५. तमिळ थलायवाजची सध्याची स्थिती काय आहे?
उ. संघाने ४ सामन्यांपैकी २ विजय आणि २ पराभव नोंदवले आहेत.
(What is Tamil Thalaivas’ current standing in PKL 12?)