शिवसेनेचा आज कुडाळात मेळावा
esakal September 15, 2025 06:45 AM

91412

शिवसेनेचा आज
कुडाळात मेळावा
कुडाळ ः कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील शिंदे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा उद्या (ता. १५) सकाळी ११ वाजता येथील महालक्ष्मी हॉलमध्ये राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.मेळाव्याला माजी शिक्षणमंत्री व आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, संपर्कप्रमुख रवींद्र पाठक, उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, प्रवक्त्या वर्षा कुडाळकर, महिला सेना जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, युवा सेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या मेळाव्यास सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.