Vishwas Patil: ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी 'पानिपत'कार विश्वास पाटील
Saam TV September 15, 2025 06:45 AM
Summary -
  • साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड झाली.

  • महाराष्ट्र साहित्य परिषदेत सर्व घटक संस्थांच्या सहमतीने त्यांचे नाव निश्चित झाले.

  • ‘पानिपत’कार म्हणून प्रसिद्ध असलेले विश्वास पाटील शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या संमेलनाचे नेतृत्व करणार आहेत.

  • या संमेलनामुळे मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक वारशाला आणि साहित्य परंपरेला नवसंजीवनी मिळणार आहे.

  • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. साताऱ्यामध्ये यंदाचे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. पुण्यामध्येआज महामंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अध्यक्षपदाबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आला.

    Marathi Sahitya Sammelan: जळगावात होणार ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बोधचिन्हाचं झालं अनावरण

    मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथे होणार्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या निवडणुकीत हा निर्णय घेण्यात आला. शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेले आगामी साहित्य संमेलन एकेकाळची मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी 'पानिपत'कार विश्वास पाटील यांची निवड होण्याचा अनोखा योगायोग यानिमित्ताने जुळून आला आहे.

    Sahitya Sammelan 2024 : अखेर साहित्य संमेलनाचे ठिकाण ठरले; तब्बल ७० वर्षांनी दिल्लीत घुमणार मराठी भाषेचा आवाज

    महाराष्ट्र साहित्य परिषदेत महामंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीला महामंडळाच्या चारही घटक संस्थांसह संलग्न आणि समाविष्ट संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या संस्थांनी अध्यक्षपदासाठी सुचवलेल्या नावांवर या बैठकीत चर्चा झाली. विश्वास पाटील यांच्या नावाला बहुतांश सदस्यांनी सहमती दर्शवल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

    Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार? शहराचं नाव जाहीर
    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.