मोदींना अंधारात ठेऊन भारत-पाक सामना; सेनेच्या बड्या नेत्याचा चिमटा, भाजपच्या जिव्हारी, असा केला पलटवार
Tv9 Marathi September 15, 2025 06:45 AM

आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान अबुधाबीत भिडत आहे. पण त्यापूर्वी देशात भाजप आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडले आहेत. पहलगाम हल्ला आणि पाक संघर्षानंतर इस्लामाबादशी भारताने संबंध तोडले आहेत. त्यात हा सामना खेळला जात असल्याने मोदी सरकारवर चौफेर टीका सुरू आहे. काँग्रेस, उद्धव सेनाच नाही तर क्रिकेटप्रेमींनी सुद्धा टीकेची झोड उठवली आहे. सेनेची टीका आता भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे त्यांच्या पलटवारातून दिसून येत आहे.

भारत-पाक सामना मोदींना अंधारात ठेऊन?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अंधारात ठेवून मॅच खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला, असा चिमटा शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी काढला. मिलिंद नार्वेकर हे MCA चे अपेक्स काउंसील मेम्बर आहेत याच्याबद्दल नार्वेकर यांची भूमिका काय असा भाजपकडून सवाल उपस्थित करण्यात आला होता. यावर नार्वेकर यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. मला वाटतय पंतप्रधान मोदीजी यांना अंधारात ठेऊन हा निर्णय झालेला आहे, असा बारीक चिमटा त्यांनी काढला. त्यामुळे दोन्ही पक्ष आमने-सामने आले आणि राजकीय सामना रंगला. भाजपच्या गोटातून त्यावर तिखट प्रतिक्रिया आली.

क्रिकेट जीवनाश्यक आहे का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः म्हणाले होते खून और पानी की बात एक साथ नही हो सकती मग आता क्रिकेट का खेळावा लागते.पाणी तर जीवनावश्यक आहे. क्रिकेट जीवनावश्यक नसताना पाकिस्तानाबरोबर क्रिकेट का खेळावं लागतंय, असा भीमटोला खासदार अनिल देसाई यांनी लगावला. पहलगाम हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर खासदार पाठवून जगभरातील देशात पाकिस्तान कशाप्रकारे दहशतवाद भारतात थोपवतोय हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्या देशांनी पाकिस्तान बरोबर संबंध ठेवू नये असं सांगण्यात आलं मग आता जर आपणच क्रिकेट पाकिस्तान सोबत खेळायला लागलो तर त्या देशांना दिलेला संदेश असं काय झालं? असा सवाल त्यांनी केला.

मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या

उद्धव सेनेच्या टीकेनंतर भाजपच्या गोटातून तिखट प्रतिक्रिया आली. भारत–पाक सामना विरोधाचं आंदोलन सुरू करण्यापूर्वी मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या अशी मागणी करण्यात आली. मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा मागण्याची हिम्मत नाही. भेंडीबाजार–मालवणीत जा आणि देशभक्ती सिद्ध करा. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा राष्ट्रवाद हा ढोंगीपणा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नवनाथ बन यांनी दिली.

भारत जिंकल्यानंतर मातोश्रीसमोर फटाके फोडा, मग देशप्रेम दाखवा. सट्टा बाजारात संजय राऊतचं नाव मोठं, पाकिस्तानविरुद्ध उपदेश देण्याचा अधिकार नाही. राऊत अलिबागच्या घरात लपून आज क्रिकेट बघणार आहेत, राष्ट्रवादाच्या नावाखाली छातीबडवणं थांबवा, अशी प्रतिक्रिया बन यांनी दिली.

पाकिस्तानमध्ये जाऊन सामना खेळणार नाही

आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता नौटंकी काही लोक या ठिकाणी करत आहेत. आपला स्टॅन्ड क्लिअर आहे. भारत पाकिस्तान बरोबर कोणत्याही भारत आणि पाकिस्तानची सिरीज असेल अशा प्रकारचा कुठलाही सामना खेळणार नाही. पाकिस्तानमध्ये जाऊन सामना खेळणार नाही असे मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट केले. परंतु जर एका प्रतियोगितेचा भाग जर एखादा सामना असेल. हा आशिया कप सामना आहे.भारत पाकिस्तान सिरीज नाहीये आणि आशिया कप मध्ये भारत पाकिस्तानचा सामना होत आहे. त्यामुळे यांचं काय म्हणणं आहे.

भारताने काय कुठल्या प्रतियोगितेमध्ये भाग घ्यायचा नाही का भारतीय संघाने उद्या वर्ल्ड कपची मॅच असेल तर वर्ल्ड कप मध्ये भारताने भाग घ्यायचा नाही का ऑलिंपिक मध्ये एखादा सामना झाला तर ऑलिंपिक मध्ये भारत आणि स्थान त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा नाही का? त्यामुळे ह्या प्रतियोगीतेतला एक सामना असून त्याच्यामुळे आपण भारत पाकिस्तान सामना भारत पाकिस्तानची खेळत आहे.

भारतात खेळत नाही पाकिस्तानच कळत नाही. तिसऱ्या ठिकाणी खेळत आहे. त्यांना आपण या ठिकाणी इन्व्हाईट केलेले नाही त्यामुळे याच्यामध्ये घेताना स्टॅन्ड पक्का क्लिअर आहे. अपेक्स बॉडीचे मेंबर त्यांचं या भारत पाकिस्तानच्या सामन्या बद्दलचे मत काय आहे? हे उद्धव ठाकरे साहेबांनी विचारलंय का त्यांना प्रतियोगिता मध्ये सहभागी होऊ नये त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा अतितायीपणा आहे, अशी टीका साटम यांनी केली.

मोदींनी खेळात द्वेष आणला नाही

पंतप्रधान मोदींनी कधीही खेळामध्ये द्वेष आणला नाही. मोदींनी खेळाला नेहमी प्राधान्या दिले आहे. ऑपरेशन सिंदुर वेळी उध्दव ठाकरे पर्यटनाला होते. ठाकरेंच्या मनात देशाबद्दल थोडी भावना आसती तर दौरा सोडून तत्काळ आले असते. देश कधीही ठाकरेंच्या राजकारणाला मान्यता देणार नाही. उध्दव ठाकरेंनी आधी या गोष्टीचे उत्तर दिले पाहीजे त्यांच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकले होते. आमची भूमिका औबीसीवर कुठलाही अन्याय होणार नाही, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.