तायक्वांदो स्पर्धेसाठी
श्रावणी इप्तेची निवड
साडवली, ता. १४ : कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत लोक विद्यालय तुळसणी या शाळेची विध्यार्थीनी श्रावणी इप्ते हिने प्रथम क्रमांक पटकावला. तालुका व जिल्हास्तरावर सुवर्णपदक मिळाले होते. तिच्या यशात प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नलावडे व सहकारी शिक्षक, मार्गदर्शक शशांक घडशी, स्वप्नील दांडेकर, सुमित पवार व पालक यांचा मोलाचा वाटा आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेत पालकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका साक्षी नलावडे, सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संस्था अध्यक्ष सुमित सुर्वे, शाळा समिती चेअरमन शर्मिला राजवडे, संचालक भाई शिंदे, गजानन सुर्वे, जयसिंगराव सुर्वे, श्रीपत मोहिते, रामचंद्र खेडेकर, जगन्नाथ सुर्वे, राजन शिंदे, अनिल बारगुडे, फारुक मुकादम यांनी श्रावणी हिचे अभिनंदन केले.