पथ्रोट : कर्णकर्कश मोठ्या भोंग्याच्या आवाजाने ध्वनिमर्यादेचे सर्रास उल्लंघन होऊन मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे त्रस्त झालेले नागरिक एकवटले असून त्यांनी शनिवारी (ता.१३) याबाबत पोलिस ठाण्यात सामूहिक तक्रार दिली आहे.
गणेश मिरवणुकीदरम्यान वॉर्ड क्रमांक एक येथील रहिवाशाच्या घरचे पीओपी सीलिंग पडल्यानंतर वॉर्ड क्रमांक पाच मिरवणूक रस्त्यावरील रहिवासी प्रणव अग्रवाल यांच्या घराचे सीलिंग पडण्याची दुसरी घटना घडली. त्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिमर्यादेबाबत रहिवासी भागात सकाळी ५५ डेसिबल व रात्रीला ४५ डेसिबल पेक्षा जास्त ध्वनिमर्यादा नसावी, असे नियम ठरवून दिले आहेत.
असे असतानासुद्धा गावातील काही मंडळांनी या नियमांचा भंग करून गणेश विसर्जन मिरवणुकीत भोंग्यांचा आवाज १०९ डेसिबलपर्यंत पोहोचविला होता. त्यामुळे लहान मुले, गरोदर माता, वयोवृद्ध नागरिक व हृदयविकाराचे रुग्ण या सर्वांना अत्यंत मानसिक त्रास सहन करावा लागला, तर अनेकांनी मिरवणूक संपेपर्यंत गावाच्या बाहेर आसरा घेतला होता.
Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणीमीना अग्रवाल, डॉ. घनश्याम गिल्डा, नीलेश पवार, राजेश गिल्डा, डॉ. प्रवीण खलोकर, अखिल वर्मा, देविदास इसोकार, प्रज्योत डोंगरे, कमला इसोकार, संजय मेहरे, गोपाळ गौड, शकुंतला वर्मा, सूर्यकांत रोंगरे, शिवदास पंचवटे, चंपा वर्मा, शिवनाथसिंग वर्मा, प्रणव अग्रवाल, नंदकिशोर पवार, शीतल वर्मा, सुनील आवारे, आकाश धोपे, नीलेश शिंगणे, प्रमोद यावतकर, रूपाली पवार, विमल पवार, नीलिमा वरेकर, साक्षी वरेकर, निकिता काळे, रमेश वरेकर, चंद्रभूषण दुबे, सुयश भगत, रवींद्र कळमकर, स्नेहल दुबे, राजेश गोड व रितेश अरबट या स्थानिक रहिवाशांनी सामूहिक तक्रार देऊन लाउडस्पीकरचा आवाज मर्यादित ठेवण्याचे निर्देश देण्यात यावे व निर्देश न मानणाऱ्या गैरकायदेशीर मंडळांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. सदर विषय शांतता समितीच्या सक्षम चर्चेत घेण्यात यावा व आम्हाला न्याय द्यावा, अशा आशयाची मागणी सदर तक्रार अर्जात केली आहे.