-डी.के.वळसे पाटील
मंचर : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागात राजेवाडी येथे राहणारे शेतकरी दत्तात्रय रामचंद्र साबळे यांच्या घरासमोर सलग तीन दिवस बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना घडली आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आनंदाची बातमी! 'गायीच्या दूध दरात तीन रुपयांपर्यंत वाढ'; सातारा जिल्ह्यात सुमारे ५५ हजार दूध उत्पादकांना दिलासासाबळे म्हणाले, “ राजेवाडी गावाजवळ जंगल आहे. त्यामुळे विविध प्रजातीच्या वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात पाळीव गावठी कोंबड्या तसेच कुत्र्यांवर हल्ल्याच्या घटना घडत होत्या. रात्रीच्या वेळी घराबाहेर कुत्र्यांचा आवाज ऐकू येत होता. सुरुवातीला कोणता वन्यप्राणी आहे याबाबत संभ्रम होता. मात्र घराजवळ बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याने शंका अधिक बळावली. सावधगिरी म्हणून यांच्या घराच्या परिसरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले.
शुक्रवार (ता.१२) ते रविवार (ता.१४) पर्यंत सलग तीन दिवस रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर दिसला. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुले, महिला व ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत. शेतीच्या कामावरही परिणाम झाला आहे. घोडेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाला बिबट्याचा वावर असल्याची माहिती कळविण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी के.के. लिमये व वनपाल पी.पी. लांघे यांनी रविवारी दुपारी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे.
Smart Meter: मीटरचा हिशोब ‘स्मार्ट’ की फसवा?; वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक संतप्त, दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात रांगा“राजेवाडी गाव व परिसरात वनखात्यामार्फत दररोज रात्री गस्त व जनजागृती केली जाईल. रात्रीच्या वेळी एकट्याने घराबाहेर पडू नये. जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची व्यवस्था केली जाईल.”
- के.के. लिमये, वनपरिक्षेत्र अधिकारी, घोडेगाव.