Ramdas Athawale : 'महापालिका-झेडपी निवडणुकीत RPI ला 8 ते 10 जागा द्या'; रामदास आठवलेंची खासदार महाडिक, क्षीरसागरांशी महत्त्वपूर्ण चर्चा
esakal September 15, 2025 09:45 PM

कोल्हापूर : ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) आगामी काळात होणार आहेत. यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आरपीआय) महापालिका निवडणुकीत पाच, तर जिल्हा परिषदेत तीन जागा द्या. तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीत ८ ते १० जागा मिळाव्यात,’ अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली. तसेच याबाबत खासदार धनंजय महाडिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी चर्चा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाचे आम्ही जुने सहकारी आहोत. आम्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महायुती म्हणूनच लढवणार आहोत. महायुतीच्या सर्व उमेदवारांना आमचा पाठिंबा असेल. तसेच रिपब्लिकन पक्षालाही (RPI) या निवडणुकीत जागा मिळाल्या पाहिजेत. यासाठी मी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik), आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी चर्चा केली आहे.

'शिवाजीनगर मेट्रो' स्थानकाचे नाव बदलण्यावरून वाद; फडणवीसांचा तीव्र विरोध, कर्नाटकचे CM म्हणाले, 'आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे...'

महापालिकेमध्ये पाच जागा, तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तीन जागा मिळाव्यात. पंचायत समितीच्या ८ ते १० जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाव्यात, अशी आमची मागणी आहे. महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीला रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही बोलावले जाईल. त्यावेळी त्यांनी यादी द्यावी, असे महाडिक, क्षीरसागरांनी सांगितले आहे. यापूर्वी आम्ही स्वबळावर निवडणूक लढवली. त्यामध्ये आमच्या उमेदवारांनी चांगली मते घेतली आहेत.’

Aurangzeb Poster Incident : औरंगजेबाच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक; अकोल्यात तणावाचं वातावरण, आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

पत्रकार परिषदेला आर.पी.आय.चे पश्चिम महाराष्ट्रप्रमुख अशोक गायकवाड, राज्य सचिव बी. के. कांबळे, राज्य कार्यकारिणी सदस्य सुनील सर्वगौड, प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्यासह नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

१६ डिसेंबरला गांधी मैदानात धम्म परिषद

आठवले म्हणाले, ‘१६ डिसेंबरला गांधी मैदानात बौद्ध धम्म परिषद होणार असून, यामध्ये विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात येणार आहे. या परिषदेमध्ये देशभरातील प्रमुख बौद्ध भिख्खू सहभागी होणार आहेत. पक्षाचा ६८ वा वर्धापन दिन महाड येथे तीन ऑक्टोबरला होणार असून, त्यामध्ये पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने विचारमंथन होणार आहे.’

खेळाचे राजकारण नको

भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याबद्दल मंत्री आठवले म्हणाले, ‘पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला भारताचा विरोध आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून शंभरहून जास्त अतिरेकी मारले. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना हा आंतरराष्ट्रीय मालिकेचा भाग आहे. त्यामुळे त्याला विरोध असण्याचे कारण नाही. खेळाचे राजकारण आणि राजकारणाचा खेळ नको. शिवसेनेचे ‘माझं कुंकू, माझा देश आंदोलन निरर्थक आहे.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.