इतिहासात काही घटनांची उजळणी केली असता आपल्या वाटते जर असे त्यावेळी झाले असते तर आजचे चित्र काही वेगळेच असते. आज ज्या गोष्टी बाबत आपण बोलत आहोत ती चार दशकांपूर्वीची आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्याने तीन युद्ध झाली होती आणि पाकिस्तान स्वत: अण्वस्र संपन्न होण्याची तयारी करत होता.याची खबर भारताला होती आणि इस्मामिक देशांनी घेरलेल्या इस्राईलला देखील होती. त्याच वेळी इस्राईलने अशी ऑफर भारताला दिली होती, ज्याने इतिहास बदलला असता..
युएनच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानला इस्राईलने दहशतवादावरुन असे खडे बोल सुनावले याबद्दल १९८० च्या दशकाची आठवण काढली जाते. या काळात इस्राईलने भारताला अशी ऑफर दिली होती की जर त्यास आपण होकार दिला असता तर आज पाकिस्तान जगाच्या नकाशावर नसता. तत्कालिन इंदिरा गांधी सरकारने या ऑफरवर गंभीरतेने विचार केला होता. आणि त्या मान्य करणारही होत्या, परंतू आंतरराष्ट्रीय दबावापुढे अंतिमक्षणी त्या झुकल्या.
एड्रीयन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क यांनी लिहीलेले पुस्तक ‘डिसेप्शन’ मध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला इस्राईलने पाकिस्तानच्या न्युक्लीअर प्रोग्रॅमची धोक्याची घंटा ओळखली होती. हे त्याच प्रकारे होते जसे इस्राईल इराण संदर्भात भूमिका घेतो. त्यावेळी इस्राईलने भारताला १९८४ मध्ये एक जॉईंट ऑपरेशनचा प्रस्ताव दिला होता. योजना अशी होती की इस्राईलचे F-16 आणि F-15 जामनगरातून रिफ्युअलिंग करुन उड्डाण घेतील आणि पाकिस्तानच्या काहुटा न्युक्लीअर सेंटरवर बॉम्ब हल्ले करतील. भारतीय जग्वार विमाने याकामी मदत करतील.
तत्कालीन पीएम इंदिरा गांधी या आधी यासाठी तयारही झाल्या होत्या. परंतू नंतर आंतरराष्ट्रीय दबाव खासकरुन अमेरिका आणि पाकिस्तानशी चौथ्या युद्धाच्या शंकेने त्यांनी माघार घेतली. इस्राईलने साल १९८१ मध्ये इराकच्या ओसिरक न्युक्लीअर रिएक्टरवर हल्ला केला होता, तसाच हल्ला पाकिस्तानच्या अणू भट्ट्यांवर करणार होता. त्यावेळी भारताने माघार घेतल्यानंतर इंदिरा गांधी यांची हत्या झाली. आणि त्यांचे पूत्र राजीव गांधी यांनी पीएम पदभार सांभाळला. त्यानंतर ही योजना बारगळली.
इस्राईलने पहिल्यांदाच पाकिस्तानच्या अतिरेक्यांना सर्मथन देण्याच्या धोरणाचा मुद्दा उचलला आहे असे नाही.पाकिस्तानचे कुख्यात हुकूमशाह झिया उल हक यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या न्युक्लीअर प्रोग्रॅम संदर्भात इस्राईलने अनेक वेळा आंतरराष्ट्रीय ताकदींना सावध केले होते. १९७९ मध्ये या संदर्भात ब्रिटीश पीएम मार्गारेट थॅचर यांना पत्रही लिहीले होते. या नंतर इस्राईलने भारताला ऑफर दिली होती. परंतू भारताला अंतर्गत अशांततेमुळे युद्ध नको होते. या शिवाय पाकिस्तानला अफगाणिस्तानच्या विरोधात अमेरिकेचे समर्थन मिळत होते. आणि अमेरिका एफ-१६ देखील पाकिस्तानला देत होता. त्यामुळे भारताला त्यावेळी एक पाऊल मागे घेणे महत्वाचे वाटत होते.