सणासुदीच्या या दिवसांमध्ये अनेक ऑनलाईन वेबसाईट अनेक प्रोडक्टवर ऑफर देत असतात. अशातच जर तुम्हालाही कमी किमतीत प्रीमियम रेंजचा फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. कारण Samsung Galaxy Z Fold 6 5G या स्मार्टफोनला अमेझॉनवर मोठी सूट दिली जात आहे. हा फोल्डेबल फोन खरेदी करायचा असेल, तर तुम्ही कोणत्याही बँक कार्डशिवाय 24 हजार रुपयांपेक्षा जास्त बचत करू शकता. कारण हा फोन 1,64,999 रुपयांना लाँच करण्यात आले होते आणि सॅमसंग स्टोअरवर सुमारे 1,49,999 रुपयांना उपलब्ध आहे. यात ड्युअल AMOLED पॅनल, ट्रिपल कॅमेरा सेटअप, उत्तम लूकसह चांगला बॅटरी बॅकअप आहे.
या फोनची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बँक डिस्काउंट आणि कॅशबॅकनंतर तुम्ही हे डिव्हाइस 1,20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. Amazon वर तुम्ही हा फोन किती किमतीत खरेदी करू शकता ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात…
Amazon वर Samsung Galaxy Z Fold 6 5G ची किंमत
25,000 रुपयांच्या मोठ्या सवलतीनंतर Amazon वर Samsung Galaxy Z Fold 6 5G ची किंमत 1,24,000 रुपये आहे. ही डील आणखी चांगली करण्यासाठी तुम्ही जर Amazon वर ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास 5% पर्यंत कॅशबॅक मिळू शकतो, ज्यामुळे किंमत 1,20,000 रुपयांपेक्षा कमी होते. इतकेच नाही तर खरेदीदार 6,060 रुपयांपासून सुरू होणाऱ्या सुलभ हप्त्यांच्या योजना देखील निवडू शकतात.
42,350 रुपयांपर्यंत मिळू शकते एक्सचेंज ऑफर
जर तुम्हाला तुमचे जुने डिव्हाइस एक्सचेंज करायचे असेल, तर तुम्हाला 42,350 रुपयांपर्यंत एक्सचेंज मिळू शकते. मात्र त्याची अचूक किंमत डिव्हाइसच्या ऑपरेटिंग सिस्टमवर अवलंबून असेल. याशिवाय, नवीन जीएसटी दरांमुळे, अमेझॉन घरगुती उपकरणे, टेलिव्हिजन इत्यादींसह अनेक उत्पादनांवर चांगले डील दिले जाणार आहे. पार्टनर ऑफर म्हणून ग्राहकांना जीएसटी इनवॉइस मिळू शकते आणि कॉर्मशियल खरेदीवर 28 % पर्यंत बचत होऊ शकते.
सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 6 5जी चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy Z Fold 6 5G मध्ये 6.3-इंचाचा AMOLED पॅनेल आणि 7.6-इंचाचा अंतर्गत मुख्य स्क्रीन आहे. दोन्ही स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटसह येतात. हे डिव्हाइस स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हे डिव्हाइस 12GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेजसह येते. यात 4,400mAh बॅटरी आहे.
या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, या डिव्हाइसमध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड आणि 10 मेगापिक्सेलचा टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फीसाठी या डिव्हाइसमध्ये 10 मेगापिक्सेल आणि 4 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.