आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांच्या बदलत्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वांची कमतरता भासू लागली आहे. ज्यात जास्त करून व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भासत आहे. व्हिटॅमिन बी 12 हा एक घटक आहे जो आपल्या डीएनए बनवण्यास आणि आपल्या पेशींसाठी ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतो. शरीरात या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा येतो. ही कमतरता विशेषतः शाकाहारी आहार घेत असलेल्या लोकांमध्ये जास्त दिसून येते, कारण व्हिटॅमिन बी 12 प्रामुख्याने मांसाहारी पदार्थांमध्ये आढळते. अशा वेळेस त्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही पूरक आहार तसेच व्हिटॅमिन बी 12 असलेल्या पदार्थांचे सेवन करू शकता.
पण तुम्हाला माहिती आहे का की शाकाहारी आहारांमध्ये एक खास डाळ आहे जी या आवश्यक जीवनसत्वाचा समृद्ध स्रोत आहे. आपण ज्या डाळीबद्दल बोलत आहोत ती खाण्यास चविष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. ती डाळ कोणती आहे आणि तुम्ही ती तुमच्या आहारात कशी समाविष्ट करू शकता ते आजच्या लेखात जाणून घेऊयात.
व्हिटॅमिन बी 12 बद्दल एक खास गोष्ट जी फार कमी लोकांना माहिती आहे ती म्हणजे हे व्हिटॅमिन शरीरात स्वतः तयार होत नाही, म्हणून तुम्हाला तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो ज्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 असते.
चणा डाळ ही प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात असते. कारण सर्वात सामान्य पण अत्यंत पौष्टिक डाळींपैकी एक आहे. त्यात प्रथिने, फायबर, लोह आणि जस्त भरपूर प्रमाणात असते. पण जेव्हा ही डाळ भिजवली जाते किंवा फर्मेंट केली जाते, जसे की ढोकळा बनवण्यासाठी तेव्हा त्यात काही प्रमाणात व्हिटॅमिन बी12 सारखी संयुगे तयार होतात. जरी ही मात्रा मांसाहारी स्रोतांइतकी नसली तरी, शाकाहारी लोकांसाठी ती एक उत्तम पर्याय असू शकते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)