Solapur News : दामाजीच्या निवडणुकीतील शब्द; 12452 शेतकऱ्यांना दिले सभासदत्व : अध्यक्ष शिवानंद पाटील
esakal September 16, 2025 03:45 AM

मंगळवेढा : दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत दिलेल्या शब्दाप्रमाणे नवीन 12,452 शेतकऱ्यांना सभासदत्व देण्याची जबाबदारी शब्द पार पाडल्याची ग्वाही अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली.

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची अधिमंडळाची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी मार्गदर्शक प्रा.शिवाजीराव काळुंगे,उपाध्यक्ष तानाजी खरात, कारखान्याचे माजी चेअरमन अॅड.।नंदकुमार पवार, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहूल शहा, रामचंद्र वाकडे, बळीराजा पतसंस्थेचे दामोदर देशमुख,रामचंद्र वाकडे अजित जगताप, चंद्रशेखर कोंडुभैरी, लतिफ तांबोळी,रामेश्वर मासाळ, प्रविण खवतोडे,किसन सावंजी आदीसह सर्व संचालक, खातेप्रमुख ,कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते।आदी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष पाटील म्हणाले की,संस्थेसमोर मोठया प्रमाणात आर्थिक अडचणी असताना निवडणूकीमध्ये सभासद-शेतकरी यांनी या संचालक मंडळावर दाखविलेल्या विश्वासास पात्र राहुन हंगामातील ऊस उत्पादकांची बिले, तोडणी-वाहतूक ठेकेदारांची देणी, कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे आज अखेरचे पगार वेळेवर करुन त्यावरील प्राॅव्हीडंट फंड, कर्मचारी पतसंस्था कपात व इतर कपाती वेळेत दिल्या. काटकसर व पारदर्शी कारभार करण्यास हे संचालक मंडळ कटिबध्द् असणार आहे. एन।सी।डी।सी। मार्फत मिळालेल्या ९४ कोटी कर्जाचा या संचालक मंडळाने योग्य रितीने विनियोग केला असून या गळीत हंगामात 5.50 लाख मे.टन गाळपाचे उद्षि्ट संचालक मंडळाने ठेवले.

कारखान्याकडे कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नाही. आर्थिक अडचणी असताना एफ.आर.पी.2571 असताना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एफ.आर.पी पेक्षा 229 रू अधिकचा दर वेळेत दिला धनश्री परिवाराचे प्रा.शिवाजीराव काळुंगे म्हणाले की, गेले तीन गळीत हंगाम या संचालक मंडळाने चांगल्या पध्द्तीने पार पाडले आहेत, त्यामुळे हे संचालक मंडळ अभिनंदनास पात्र आहे। कारखान्यामध्ये उत्पादन खर्च वाढल्याने व एफ।आर।पी। मुळे साखर कारखानदारी अडचणीत आली अशा परिस्थितीत स्पर्धेत टिकून गळीत हंगाम पार पाडावा लागणार आहे.

माजी अध्यक्ष अॅड नंदकुमार पवार यांनी कारखाना चांगला चालविलेबध्द्ल संचालक मंडळाचे अभिनंदन करुन लवकरच सहप्रकल्प उभारणी करावी.प्र.कार्यकारी संचालक श्री रमेश जायभाय यांनी मागील वार्षिक सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा संस्थेच्या कामकाजाविषयी अहवाल स्विकारणे, ताळेबंद व नफा-तोटा पत्रके स्विकारणे व त्यास मान्यता देणे, वैधानिक लेखापरिक्षक यांचेकडून आलेला लेखा परिक्षण अहवाल वाचून नोंद घेणे, संचालक मंडळाने सादर केलेला दोष दुरुस्ती अहवाल स्विकारणे व त्यास मान्यता देणे, आर्थिक वर्षात अंदाजपत्रकापेक्षा कमी-जास्त झालेल्या जमाखर्चास मंजूरी देणे, पुढील आर्थिक वर्षाकरिता संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, पुढील वर्षाकरिता वैधानिक लेखापरिक्षक व आवश्यकतेनुसार इतर सल्लागारांच्या नेमणूका करणे, आर्थिक वर्षातील अनावश्यक भंगार माल विक्रीस मान्यता देणे इत्यादी विषय वाचुन दाखवून मंजुरी दिली. विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर शांततेने खुलासेवार उत्तरे देवून सभासदांचे शंका निरसन अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशेाक उन्हाळे यांनी तर संचालक रेवणसिध्द् लिगाडे यांनी मानले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.