कोंढाळी : बाजारगाव येथील जिल्हा परिषद शाळेत एक धक्कादायक घटना घडली. कचरा न उचलल्याच्या कारणावरून पाचवीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थीनींना शिक्षिका मनिषा चौधरी यांनी बेदम मारहाण केली.
यात एक मुलगी बेशुद्ध पडली तर दुसरीच्या हाताला दुखापत झाली. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीनंतर कोंढाळी पोलिस ठाण्यात मनिषा चौधरी या शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी (ता.१३) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. श्रेयाली पुंडलिक गाडवे व सोनम निलेश सहारे या दोघींनी कचरा उचलण्यास नकार दिल्याने संतापलेल्या शिक्षिकेने त्यांना मारहाण केली.
श्रेयाली बेशुद्ध पडली तर सोनमच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तत्काळ गावकऱ्यांच्या मदतीने दोन्ही मुलींना ॲम्बुलन्सने कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
Nagpur Heavy Rain : जिल्ह्यात जोरदार पावसाची उसंडी; नदी नाले ओसंडले, नागरिकांच्या घरात पाणी शिरलेघटनेची माहिती मिळताच समाजसेवक संजय गायकवाड यांनी १०९८ चाईल्ड हेल्पलाईनवर कळवले. त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा कांबळे व मेघा पाटील यांनी चौकशी केली. प्राथमिक तपासणीत घटना सत्य असल्याचे समोर आल्यानंतर पालक मंदा सहारे व चंदा गाडवे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला.